Home Blog Page 123

नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवाच्या यात्रेला प्रारंभ

नारायणगाव : किरण वाजगे

संपूर्ण पुणे जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या व सर्वात जास्त दिवस चालणाऱ्या नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवाच्या यात्रेला आज उत्साहात प्रारंभ करण्यात आला.यात्रेच्या पहिल्या दिवशी श्री मुक्ताबाई देवीच्या उत्सव मूर्ती व पादुकांची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा काढत मिरवणूक व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी यात्रा समितीचे संयुक्त अध्यक्ष संतोष नाना खैरे, सुजित खैरे, सरपंच योगेश पाटे, देवस्थान ट्रस्ट व समाज मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी तसेच समस्त ग्रामस्थ नारायणगाव वारूळवाडी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सकाळी नऊ वाजता श्री मुक्ताबाई देवी मंदिरातून देवीची चांदीची मूर्ती पालखी मध्ये ठेवून मावळे आळी वाजवी आळी पेठ आळी मार्गे हनुमान चौकात आली तेथून बाजारपेठ मधून पूर्व वेस मार्गे पुन्हा मुक्ताई मंदिरात पालखी ग्राम प्रदक्षिणा घालत वाजत गाजत आणण्यात आली. याप्रसंगी देवीची महाआरती, अभिषेक करण्यात आला.
यात्रा सलग आठ दिवस होणार असून देवीला मांडव डहाळे, शेरणी नैवद्य, पालखी व घागरी मिरवणूक, छबिना मिरवणूक, शोभेचे दारूकाम तसेच कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे.

या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दिवंगत ज्येष्ठ तमाशा कलावंत तुकाराम खेडकर, पांडुरंग मुळे तसेच विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेची मिरवणूक देखील काढण्यात आली. सतत आठ दिवस आजपासून रोज रात्री लोकनाट्य तमाशाचे कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती यात्रा समितीचे संयुक्त अध्यक्ष संतोष नाना खैरे, सुजित खैरे व सरपंच योगेश पाटे यांनी दिली.

कवठे येमाई येथे जागतिक हिवताप दिन साजरा

 धनंजय साळवे- कवठे येमाई येथील जि.प.प्रा.शाळेमध्ये जागतिक हिवताप दिन जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती शिरुर, प्रा.आरोग्य केंद्र,व येमाई माता शैक्षणिक सामाजिक क्रिडा संघ(येस क्लब) यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

यावेळी आरोग्य कर्मचार्यानी हिवताप होण्याची कारणे ,दुषित पाणी, डास पैदास होण्याची ठिकाणे,डास निर्मुलन करण्यासाठी करण्याच्या उपाययोजना, डासांची पैदास कमी करण्यासाठी रासायणिक औषध फवारणी, धुरफवारणी, साचलेले पाणी व तुंबलेले गटारे वाहती करणे,गप्पीमासे सोडणे,परीसरस्वच्छता,आरोग्य शिक्षण, मेंदुज्वर,जलद ताप सर्वेक्षण, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळणे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर हिवताप जनजागरण फेरी गावातुन काढण्यात आली.

या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दामोदर मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री नामदेव पानगे,श्री. जालिंदर मारणे तालुका हिवताप पर्यवेक्षक, श्री.रोहिदास नवले आरोग्य सहाय्यक, श्री. गंगाराम कोकडे आरोग्य सहाय्यक, श्री. संजय परदेशीं आरोग्य सहाय्यक, श्री. संजय मिसाळ आरोग्य सहाय्यक श्री. लक्ष्मण थोंगिरे आरोग्य सहाय्यक, श्री.डी ए मारणे आरोग्य सहाय्यक, मुख्याध्यापक शांताराम पोकळे सर,श्री.फंडसर,सौ.कुभार मॅडम, सा.कार्यकर्त्ये श्री.सोपान वागदरे, श्री.अनिल रायकर,श्री.गोपीनाथ रायकर,ग्रामस्थ कवठे, जि.प.शालेय विद्यार्थी आणि परीसरातील सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनायक गोसावी यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत येस क्लबचे उपाअध्यक्ष डॉ. संतोष उचाळे व आभार अध्यक्ष नवनाथशेठ सांडभोर यांनी मानले.

दुर्देवी- कालव्यात बुडणाऱ्या एकाचा मृत्यू , तिघांचे वाचवले प्राण

किरण वाजगे

नारायणगाव (ता. जुन्नर) येथील आर्वी केंद्राजवळ वडज धरणाचा मीना शाखा कालवा व डिंभा धरणाचा डावा कालवा एकत्रित येणार्‍या संगमाजवळ शनिवार (दि.२३ ) एप्रिल रोजी दुपारी कालव्यात पोहायला गेलेल्या चार युवकांपैकी तीन जणांना वाचवण्यात येथील चार युवकांना यश मिळाले. मात्र दुर्दैवाने १६ वर्षीय नौषाद गुलाम खान या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

दरम्यान माजी सैनिक चंद्रकांत मुळे यांच्या पत्नी वैशाली यांनी कालव्याजवळ असताना वाचवा वाचवा असा आवाज आल्याने त्यांनी जवळच असलेल्या युवकांना तात्काळ बोलावले. यावेळी तेथे असलेले युवक भूषण सोनवणे, सिद्धांत म्हस्के, निरंजन वैष्णव व सिद्धार्थ जाधव यांनी पाण्यात बुडत असलेले कुमार रेहान, कुमार शर्मा व नाव न समजलेला अन्य एक जण अशा तिघांना स्वतःचा जीव धोक्यात घालून कालव्याच्या बाहेर सुखरूप काढून जीवदान दिले.

या कामगिरीबद्दल नारायणगाव येथील श्री मुक्ताई देवी यात्रा कमिटीच्या वतीने या चारही युवकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

दरम्यान पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या नौषाद खान चे वडील गुलाम मुस्तफा सलीम खान (रा. ओमकार समृद्धी सोसायटी, कोल्हेमळा, नारायणगाव) यांनी नारायणगाव पोलिस स्थानकात आपल्या मुलाच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये तसेच त्याचा मृत्यू हा पाण्यात बुडून व दुर्दैवाने झाला असून त्याचे पोस्टमार्टम करू नये अशा आशयाचा जबाब नारायणगाव पोलीस स्थानकात दिला आहे.

दरम्यान गुलाम मुस्तफा खान यांचा कोल्हे मळा येथे भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.माझा मुलगा माझी दुचाकी घेऊन आर्वी केंद्र येथे कालव्यावर पोहायला गेला व पाण्यात बुडाला अशी माहिती मिळताच मी काही जणांसह तेथे गेलो व माझ्या मुलाला नारायणगाव येथील मॅक्स केअर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे जबाबात गुलाम खान यांनी म्हटले आहे.

दरम्यान तीन युवकांना जीवदान देणाऱ्या निरंजन वैष्णव, भूषण सोनवणे, सिद्धांत म्हस्के व सिद्धार्थ जाधव यांच्यावर तिघांचे प्राण वाचवल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.

निधन वार्ता- नाभीक संघटनेचे जेष्ठ नेते दत्तात्रेय जाधव यांचे निधन

केडगाव- नाभीक संघटनेचे जेष्ठ नेते कै दत्तात्रेय शंकर जाधव (वय ,76 वर्ष )यांचे दुःखत निधन झाले आहे त्यांच्या पश्चात दोन मुलं तीन मुली सुना नातवंडे आहेत केडगाव बोरीपार्धी चौफुला नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल दत्तात्रय जाधव यांचे वडील होते.

दशक्रीया विधी गुरुवार दि 27/4/2022 रोजी बोरमलनाथ मंदिर चौफुला या ठिकाणी सकाळी आठ वाजता होणार आहे

वंचितांच्या शिक्षणासाठी टच अ लाइफचे कार्य मोलाचे – शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे

नारायणगाव : किरण वाजगे

नव्या संगणक युगात प्रवेश करताना अजूनही दुर्गम डोंगराळ आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक सुविधा पुरेशा प्रमाणात प्राप्त होत नाहीत या पार्श्वभूमीवर टच अ लाइफ आणि पारीख फाउंडेशन यांनी संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालय अशी सर्व सुविधा युक्त सुसज्ज इमारत निर्माण केले आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे असे विचार पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ सुनंदा वाखारे यांनी व्यक्त केले.

“मंदिराच्या कलशारोहण इतकाच महत्त्वाचा हा उपक्रम आहे, आपल्याकडे लोकशिक्षणाची चळवळ अजून प्रभावी पणे राबवण्यासाठी अशा दानशूर दात्यांच्या योगदानाची गरज आहे” असे मत तहसीलदार रविन्द्र सबनीस यांनी व्यक्त केले.पारीख फाऊंडेशन अशा सर्व उपक्रमांत सातत्याने योगदान देत राहील असा विश्वास मिलन पारीख यांनी व्यक्त केला.

येडेश्वर विद्यालय येडगाव येथे उभारण्यात आलेल्या या वास्तूच्या उद्घाटन २३ एप्रिल रोजी संपन्न झाले. अध्यक्षस्थानी तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस उपस्थित होते.या उपक्रमासाठी मोलाचे योगदान देणारे पारीख फाऊंडेशनचे जितूभाई पारीख आणि मिलन पारीख हे देखील उपस्थित होते.

टच अ लाइफ या संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत ३५ शाळांमध्ये इयत्ता नववी आणि दहावीची मोफत पाठ्यपुस्तके गेली चार वर्षे दिली जात आहेत आणि अकरा शाळांमध्ये सुसज्ज संगणक प्रयोगशाळा आणि ई-लर्निंग प्रोजेक्टर देण्यात आलेला आहे अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक नरेश सुराणा यांनी दिली .

या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रेमी ग्रामस्थ गुलाब नेहरकर, राजेंद्र रासकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक सिताराम सोनवणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वाघदरे आणि सचिव अशोक काकडे, मारुती ढोबळे, दीपक घाडगे,सुरेश कसार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गणपुले यांनी केले तर आभारप्रदर्शन दीपक घाडगे यांनी केले.

रामोजी फिल्म सिटीमध्ये हॉलिडे कार्निवल मध्ये ग्रुप डान्समध्ये शिरुर परीसरातील ग्रामिण महिलांना पारितोषिक

कवठे येमाई (प्रतिनीधी धनंजय साळवे) – ग्रामीण भागातील महिलांना घर आणि मूल याच्या बाहेर पडता यावं या हेतूने महिलांची हैद्राबादला विमानाने सहल नेण्यात आली. रामोजी फिल्म सिटीच्या भटकंतीमध्ये ट्रिपच्या दरम्यान रामोजी फिल्म सिटीमध्ये हॉलिडे कार्निवल मध्ये ग्रुप डान्समध्ये शिरुर परीसरातील ग्रामिण महिलांनी सहभाग घेतला आणि पारितोषिक पण मिळवले.

ग्रामीण भागातील महिलांना संधी मिळाली तर त्या जिद्दीने सर्व काही करू शकतात हा विश्वास महिलांमध्ये रुजताना दिसतोय.

आज ग्रामिण भागातील महिला आत्मविश्वसाने पुढे जाताना दिसत आहे आपल्या कुटुंबाची जबाबदारी प्राधानान्ये देत तर आहेच पण त्याचबरोबर स्वतःतील स्वत्व ओळखुन आपल्या आवडी निवडीलाही वाव देताना दिसत आहे.

सामाजिक कार्यकर्त्या सौ.वैशालीताई रत्नपारखी व त्यांचा गृप हे सतत ग्रामिण भागातील महिलांना स्वताच्या पायावर उभे रहाण्यासाठी व्यावसाईक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत असतात. त्याचबरोबर महीलांना पर्यटनाची संधी मिळावी म्हणुन राज्यात, परराज्यात , विमान,रेल्वे,आरामबस ने पर्यटनासाठी प्रवासाची संधी देत असतात.

ह्या सहलीमध्ये जिजाताई दुर्गै मा.सरपच निमोणे,साधना पोकळे ग्रा.पं.सदस्या कवठे, नंदा घोडे,साधना शेलार, सुषमा पठारे,कविता राक्षे,वसुंधरा पांचगे,संगिता शिन्दे,सारीका पोकळे,ज्योती पाटील,

माधुरी निगडे,प्रतिक्षा मेंगवडे ,राजश्री काळे,जया खांडरे,जया तरडे,रेखा महाजन,शुभांगी पवार ई.महिला भगिनींनी सहभाग घेतला.

सर्वांगीण विकास हा बालकांचा नैसर्गिक हक्क – सरपंच योगेश पाटे

नारायणगाव ,किरण वाजगे

विशेष गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर मुलांना कला, क्रीडा, मनोरंजन यांची संधी देऊन त्यांच्या विकासाचा विचार करायला हवा, सर्वांगीण विकास हा बालकांचा नैसर्गिक हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी शाळा, शासन आणि समाज यांनी संयुक्त प्रयत्न केले पाहिजेत असे मनोगत नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी व्यक्त केले.

पंचायत राज दिनानिमित्त जि.प.प्राथमिक शाळा नारायणगाव नं.१ येथे ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या वतीने आयोजित केलेल्या बालसभेचे अध्यक्ष म्हणून सरपंच योगेश पाटे बोलत होते.

याप्रसंगी माजी उपसरपंच संतोष दांगट, रोटरी क्लबचे हॅप्पी स्कूल प्रकल्पाचे समन्वयक रो.सचिन घोडेकर, रो.तेजस वाजगे, रो.प्रशांत ब्रम्हे, मेहबूब काझी, ग्रामपंचायात सदस्या रुपाली जाधव,. पुष्पाताई आहेर, मुख्याध्यापक निवृत्ती कामठकर,आशा झोडगे, अकील नळगिरकर, आझम शेख, राजेश रत्नपारखी, मच्छिंद्र जगताप, प्रतिक पोखरकर,अझर शेख, शिक्षक, विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

नारायणगाव परिसरातील सर्व शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी ग्रामपंचायत नारायणगाव आवश्यक प्रयत्न करीत आहे, भविष्यकाळात क्रीडा साधनं, व्यायामशाळा, सांस्कृतिक महोत्सवासोबत क्रीडा महोत्सव सुरू करणार असल्याचे सरपंच पाटे यांनी सांगितले.

या सभेत बाल हक्क आयोगाअंतर्गत बालकांचे हक्क आणि त्यांची अंमलबजावणी या विषयी मेहबूब काझी यांनी तसेच बालकांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांबद्दल भाग्यश्री बेलवटे यांनी माहिती सांगितली. यावेळी मुख्याध्यापक निवृत्ती कामठकर, आशा झोडगे, आझम शेख, विद्यार्थी सार्थक ओव्हाळ, पूर्वी लाडके, मोहम्मद अन्सारी यांचीही भाषणे झाली.

यावेळी रोटरी क्लब नारायणगाव यांच्यावतीने ‘हॅप्पी स्कूल ‘ या प्रकल्पाअंतर्गत नारायणगांव येथील जिल्हा परिषद मुलींची प्राथमिक शाळेची निवड करण्यात आली असून याद्वारे शाळेत भौतिक सुविधांबरोबरच ‘रोटरी संगणक कक्ष’ विक्रांत पतसंस्थेच्या वतीने ‘ विक्रांत शुद्ध पेयजल योजना’ कार्यान्वित करीत असल्याची घोषणा प्रकल्प समन्वयक रो.सचिन घोडेकर यांनी केली. सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक निवृत्ती कामठकर यांनी केले, सूत्रसंचालन भाग्यश्री बेलवटे यांनी केले व आभार मच्छिंद्र जगताप यांनी मानले.

वाघोलीत बेवारस तरुणाला मिळाला ‘माहेर’ संस्थेच्या ‘करुणालया’चा ‘आधार’

अमोल भोसले

वाघोली परिसरात १० ते १२ दिवसांपासून एक युवक अत्यंत दयनीय अवस्थेत वावरत होता.मिळेल ते खायचे व रात्री कुठेही झोपायचे हि त्याची सध्याची दिनचर्या होती.पंरतु वाढत्या तापमानामुळे व पुरेशे अन्न व पाणी न मिळाल्याने त्या युवकाची अवस्था अत्यंत नाजूक झाली होती.जागेवरून उभे राहणे ही त्यास अशक्यप्राय झाले होते.त्यामुळे तो एका ठिकाणी मरणासन्न अवस्थेत पडून होता.

हि गोष्ट मिलिंद गुडदे यांनी वाघोली येथील सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार गणेश सातव यांच्या कानावर घातली असता गणेश सातव यांनी त्वरित त्या युवकास प्रथमतः उचलून एका सावलीच्या ठिकाणी बसवून त्यास पाणी व अल्पोहार देत त्याची विचारपूस केली.यावेळी हा युवक नोकरीसाठी महाराष्ट्रात आल्याचे स्पष्ट झाले.हा युवक निराधार असल्याचे त्याने सांगितले.

हा तरुण निराधार असल्याने त्याला उपचार व पुढील पुनर्वसनासाठी माहेर संस्थेच्या सणसवाडी(ता-शिरुर) येथील ‘करुणालया’ प्रकल्पात दाखल करण्याचे ठरले.तत्पूर्वी युवकास प्राथमिक उपचार करणे आवश्यक असल्याने गणेश सातव यांनी पत्रकार मित्र सचिन धुमाळ,शंकर पाबळे यांच्या मदतीने वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.नागसेन लोखंडे यांना घेऊन सदर तरुणांची तपासणी केली.त्यानंतर वाघोली येथील सामाजिक कार्यकर्ते व अखिल भारतीय सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शनी शिंगारे यांच्याकडे या तरुणाला पुढील उपचार व पुनर्वसनसाठी माहेर संस्थेच्या करुणालया प्रकल्पात दाखल करणेकामी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याची विनंती केली असता त्यांनी हि त्वरित सदर ठिकाणी रुग्णवाहिका पाठवून दिली.

लोणीकंद पोलिस ठाणे येथे काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडून व उपचार व पुनर्वसन यासाठी संस्थेत दाखल करुन घेण्याबाबचे पत्र तयार करून घेऊन या तरुणास माहेर संस्थेच्या सणसवाडी येथील ‘करुणालया’ प्रकल्पात दाखल केले असून त्या ठिकाणी त्यावर उपचार केले जाणार आहेत.याकामी लोणीकंद पोलीस ठाणे व माहेर संस्थेचे सचिन पिसे,तुकाराम डोकले,विठ्ठल गायकवाड यांनी मोठे सहकार्य केले.

गणेश सातव यांनी माणुसकी जपत आपल्या मित्रमंडळींच्या सोबतीने आत्तापर्यंत रस्त्यावरील जवळपास ९ बेवारस,निराधार मनोयात्री रुग्णांना माहेरसह वेगवेगळ्या संस्थेत दाखल करणेकामी प्रयत्न केले आहेत.

सध्याच्या तंत्रज्ञान व धावपळीच्या युगात मी व माझे कुटुंब यापलीकडे आपल्या आजुबाजुला काय होतयं,समाजात काय सुरु आहे याचेही भान हरवलेल्यांना ‘माणुसकी’ च्या या घटनेमुळे आजही कुठे तरी ‘माणुसकी जिवंत’असल्याचे ‘समाजभान’पहायला मिळाले.

याकामी वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.नागसेन लोखंडे,अखिल भारतीय सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शनीभाऊ शिंगारे,पत्रकार सचिन धुमाळ,नाथाभाऊ उंद्रे,शंकर पाबळे,‌ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गुडदे, रुग्णवाहिका चालक ऋषीकेश पवार यांचे सहकार्य लाभले.

वाघोलीतील “शासन आपल्या दारी” कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

गणेश सातव,वाघोली

सर्वसामान्य नागरिक व असंघटित दगड कामगारांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शुक्रवारी (दि.२२) वाघोली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. वाघोलीतील सोयरिक गार्डन मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाचा तब्बल ४३०० नागरिकांना लाभ झाला असल्याची माहिती शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली.

वाघोलीतील नागरिकांचे विविध प्रश्न एकाच ठिकाणी मार्गी लागावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अँड अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार ,हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार तृप्ती कोलते,गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के,अँड बी.एम.रेगे, सरपंच वसुंधरा उबाळे तसेच विविध विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडितआप्पा दरेकर, सुनीलचाचा जाधवराव, रामभाऊ दाभाडे, राजेंद्र सातव पाटील, बाळासाहेब सातव गवळी, बाळासाहेब सातव सर ,राजू वारघडे, शिवदास उबाळे, किसन महाराज जाधव, बाळासाहेब शिंदे, प्रफुल्ल शिवले, राजेंद्र नरवडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुरवठा, आरोग्य, महसूल, सामाजिक योजना, महा ई सेवा केंद्र, पोस्ट, वन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, भूमी अभिलेख, पीएमपीएमएल आदी विभागाचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध होते.

अशा विविध विभागाच्या माध्यमातून नवीन रेशन कार्ड नोंदणी, नाव दुरुस्ती, आरोग्य तपासणी, कोविड लसीकरण, तलाठी व मंडलाधिकारी उत्पन्नाचा चौकशी अहवाल, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब योजना, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, सर्व प्रकारची प्रतिज्ञापत्र, पॅनकार्ड, नवीन आधार कार्ड नोंदणी, नाव दुरुस्ती व आधार कार्ड लिंक करणे आदी कामे एकाच ठिकाणी ठेवण्यात आली असल्याने नागरिकांनी यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

“शिरूर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अँड.अशोकबापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तहसीलदार कार्यालय,पंचायत समिती,हवेली यांच्या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पार पाडला. यामध्ये दगडखाण कामगार बांधवांसह वाघोलीतील परिसरातील नागरिकांच्या आडलेल्या शासकीय कामांचा तातडीने जागेवरचं निपटारा करण्यात आला.याबद्दल सर्व नागरिकांच्या व संतुलन संस्थेच्यावतीने आमदार अँड.अशोकबापू पवार व प्रशासनाचे मनपुर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो.”
अँड.बी.एम.रेगे
संस्थापक-: संतुलन संस्था.

“वाघोली परिसरातील नागरिक व दगड खाण कामगार यांच्या असलेल्या नागरी समस्या सोडविण्यासाठी आमदार अँड.अशोकबापू पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता.महसूल प्रशासनच्या सहकार्यातून ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवण्यात आला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य,गोरगरीब नागरिकांचे प्रश्न जागेवरचं मार्गी लागले.त्याबद्दल समाधान वाटत आहे.”
सुनीलचाचा जाधवराव
सामाजिक कार्यकर्ते,वाघोली.

शरदचंद्रजी पवार भोजन थाळीचा जुन्नर बाजार समितीचा उपक्रम उल्लेखनीय – अजित पवार

नारायणगाव ,किरण वाजगे

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांच्या वतीने बाजार समितीच्या आवारात येणाऱ्या शेतकरी व्यापारी कामगार यांच्यासाठी नारायणगाव उपबाजार केंद्रामध्ये सुरु केलेला “शरदचंद्रजी पवार भोजन थाळी” चा उपक्रम उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजार समितीचे सभापती संजय काळे व संचालक मंडळाचे यावेळी अभिनंदन केले.जुन्नर बाजार समितीने नारायणगाव उपबाजारात सुरू केलेल्या शरदचंद्रजी पवार भोजन थाळी चा शुभारंभ शुक्रवार (दि.२२ ) रोजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी आमदार अतुल बेनके, उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक धनेश संचेती, निवृत्ती काळे, प्रकाश ताजने, संतोष घोटणे, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार,, शरद लेंडे, मोहित ढमाले, ज्येष्ठ बागायतदार गुलाबराव नेहरकर, विनायक तांबे, तुळशीराम शिंदे, बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे, सहसचिव शरद धोंगडे तसेच व्यापारी, शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तयार केलेल्या थाळीची उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. किती भाज्या देणार, भोजन थाळी ची किंमत काय आहे, कोणता तांदूळ वापरता या गोष्टीची माहिती सभापती काळे यांच्याकडून पवार यांनी जाणून घेतली.