वाघोलीतील “शासन आपल्या दारी” कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

गणेश सातव,वाघोली

सर्वसामान्य नागरिक व असंघटित दगड कामगारांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शुक्रवारी (दि.२२) वाघोली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. वाघोलीतील सोयरिक गार्डन मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाचा तब्बल ४३०० नागरिकांना लाभ झाला असल्याची माहिती शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली.

वाघोलीतील नागरिकांचे विविध प्रश्न एकाच ठिकाणी मार्गी लागावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अँड अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार ,हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार तृप्ती कोलते,गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के,अँड बी.एम.रेगे, सरपंच वसुंधरा उबाळे तसेच विविध विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडितआप्पा दरेकर, सुनीलचाचा जाधवराव, रामभाऊ दाभाडे, राजेंद्र सातव पाटील, बाळासाहेब सातव गवळी, बाळासाहेब सातव सर ,राजू वारघडे, शिवदास उबाळे, किसन महाराज जाधव, बाळासाहेब शिंदे, प्रफुल्ल शिवले, राजेंद्र नरवडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुरवठा, आरोग्य, महसूल, सामाजिक योजना, महा ई सेवा केंद्र, पोस्ट, वन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, भूमी अभिलेख, पीएमपीएमएल आदी विभागाचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध होते.

अशा विविध विभागाच्या माध्यमातून नवीन रेशन कार्ड नोंदणी, नाव दुरुस्ती, आरोग्य तपासणी, कोविड लसीकरण, तलाठी व मंडलाधिकारी उत्पन्नाचा चौकशी अहवाल, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब योजना, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, सर्व प्रकारची प्रतिज्ञापत्र, पॅनकार्ड, नवीन आधार कार्ड नोंदणी, नाव दुरुस्ती व आधार कार्ड लिंक करणे आदी कामे एकाच ठिकाणी ठेवण्यात आली असल्याने नागरिकांनी यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

“शिरूर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अँड.अशोकबापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तहसीलदार कार्यालय,पंचायत समिती,हवेली यांच्या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पार पाडला. यामध्ये दगडखाण कामगार बांधवांसह वाघोलीतील परिसरातील नागरिकांच्या आडलेल्या शासकीय कामांचा तातडीने जागेवरचं निपटारा करण्यात आला.याबद्दल सर्व नागरिकांच्या व संतुलन संस्थेच्यावतीने आमदार अँड.अशोकबापू पवार व प्रशासनाचे मनपुर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो.”
अँड.बी.एम.रेगे
संस्थापक-: संतुलन संस्था.

“वाघोली परिसरातील नागरिक व दगड खाण कामगार यांच्या असलेल्या नागरी समस्या सोडविण्यासाठी आमदार अँड.अशोकबापू पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता.महसूल प्रशासनच्या सहकार्यातून ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवण्यात आला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य,गोरगरीब नागरिकांचे प्रश्न जागेवरचं मार्गी लागले.त्याबद्दल समाधान वाटत आहे.”
सुनीलचाचा जाधवराव
सामाजिक कार्यकर्ते,वाघोली.

Previous articleशरदचंद्रजी पवार भोजन थाळीचा जुन्नर बाजार समितीचा उपक्रम उल्लेखनीय – अजित पवार
Next articleवाघोलीत बेवारस तरुणाला मिळाला ‘माहेर’ संस्थेच्या ‘करुणालया’चा ‘आधार’