Home Blog

आळंदी-शहीद राजेंद्र किर्वे प्रतिष्ठानच्या वतीने फिजिओथेरपी व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

आळंदी : संघर्ष फौंडेशन संचालित शहीद राजेंद्र किर्वे प्रतिष्ठानच्या वतीने आळंदी शहरातील नागरिकांसाठी फिजिओथेरपी व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आळंदी येथील मोरया हेल्थकेअर सेंटर येथे करण्यात आले होते. या आरोग्य शिबीर चे उदघाटन माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील,माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे,माजी नगरसेवक अशोक उमरगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी मोरया हेल्थकेअर सेंटर चे प्रितम किर्वे, भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे नेते हभप संजय महाराज घुंडरे,नगरसेवक पांडुरंग वहीले,भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे,दिनेश कुऱ्हाडे,सुनिल रानवडे,अविनाश बोरूंदिया,नित्यानंद कुर्‍हाडे,आनंद वडगावकर,सतिष कुऱ्हाडे,बंडुनाना काळे,माऊली बनसोडे,संतोष घुंडरे,भागवत काटकर,बाळासाहेब किर्वे उपस्थित होते.

भाजप नेते संजय घुंडरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की असे उपक्रम हे नेहमी करण्यात यावे रुग्णसेवा हेच ईश्वरसेवा आहे.असे आरोग्य शिबीर प्रितिम किर्वे यांच्या माध्यमातून नेहमी होत असतात.त्यात रुग्णाची रक्त लघवी व फिजिओथेरपी केली जाते ही आनंदाची गोष्ट आहे.मी यांचे मनापासून कौतुक करतो व असे आरोग्य शिबीर घेत राहावे.
फिजिओथेरपी विभाग कडून पाठ दुखी, मणक्याचे आजार व असे विविध आजारांवर फिजिओथेरपी करण्यात आले. यावेळी डॉ.पुजा कोरडे आणि डाॅ.सरोज अंबिके यांनी फिजिओथेरपी वर मार्गदर्शन केले व रुग्णांवर उपचार केले.

या आरोग्य शिबिरात अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराच्या यशस्वते साठी सुप्रिया फडताळे,फरजान नदाफ,ज्ञानेश्वर कोकनर,श्रेयश खरगे व हॉस्पिटलच्या पूर्ण स्टाफने परिश्रम घेतले.

1

ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक / रॅली काढल्यात होणार कारवाई

प्रमोद दांगट, निरगुडसर

आंबेगाव तालुक्यात पार पडलेल्या २५ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी / निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कुणी गर्दी जमवू नहे तसेच कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नहे म्हणून उमेदवाराने मिरवणूक किव्हा रॅली काढल्यात त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी प्रत्येक तालुक्यातील पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार तालुक्यात दिनांक 18 रोजी विजयी उमेदवार व त्यांच्या पॅनलच्या कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन उमेदवाराची कुठलीही विजय मिरवणूक रॅली काढू नये तसेच पराभूत उमेदवारच्या घरासमोर फटाके वाजवणे ,विरोधी गटातील कार्यकर्त्यांच्या अंगावर गुलाल उधळणे ,परवानगीशिवाय बॅनर लावणे ,असे कृत्य करू नये असे कृत्य केल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

तसेच दिनांक 18/1/2021 रात्री दहा ते दिनांक 19/1/2021 रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व हॉटेल, ढाबे ,खानावळी,चायनीज सेंटर, पान टपरी ,यांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

दरम्यान प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी कडक केली जाणार असून त्याचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल असे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी सांगितले आहे.

1

युवा उद्योजक संतोष उर्फ दादा देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख

राजगुरूनगर श्री संतोष उर्फ दादा यल्लप्पा देवकर एक युवा उद्योजक ,एक यशस्वी आणि अगदी शुन्यातुन विश्व निर्माण करणारा दादा देवकर .दादाचा जन्म वडार समाजील घरात अठरा विश्व दारीद्र्य .अगदी अलीकडच्या काळात म्हणजे दहा वर्षापुर्वी हा दादा शेळ्या चारायचे काम करायचा. जेमतेम शिक्षण घरात सर्वात लहाण दादाच याांच्या पेक्षा मोठे पाच भाऊ आणि एक बहिण.

पाच नंबरचा भाऊ पांडुरंग देवकर चांगला शिक्षण घेत होता बाकिचे भाऊ रोडच्या कामावर दगड फोडायचे काम करायचे .दादा लहाण म्हणून त्याला एक तीन चाकि टेम्पो घेऊन दिला होता.

मला आठवतय दादानी मला विचारले होते भाऊ गाडी घेतोय कुठे धंदा मिळेल का ?

मी सांगितले कंपणीत नाय रे कुठे धंदा पण जर तुझी तयारी असेल तर आपल्या गावात आणि खेडमधे खुप धंदा आहे फक्त करणारा पाहिजे.
दादानी गाडी घेतली खुप कष्ट केले आणि बघता बघता भाऊ नागनाथ देवकर , शहाजी देवकर आणि पांडुरंग देवकर यांच्या साथीने प्रगती करत करत प्रगती डेव्हलपर्स आणि जय अंबिका कस्ट्रक्शन या नावाने व्यवसाय चालु करुन उत्तुग भरारी घेतली.
एक झोपडीत राहणारा पोरगा एसी गाडीत फिरायला लागला.

आणि बघता बघता दोन तीन पोकलेन मशीन आणि ट्रेलरचा मालक झाला आणि आज रोजी तो आमच्या गावच्या ग्रामपंचायत मधे विद्यमाण ग्रा. सदस्य म्हणून काम करत आहे . आणि एवढ सगळे असुन सुद्धा आमचा दादा अजुनही जमिणीवर आहे ही बाब आमच्या साठी महत्वाची आहे.
अशा ह्या आमच्या श्री संतोष उर्फ दादा देवकर या मित्रास जन्मदिवसाच्या कोटि कोटि शुभेच्छा आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना

1

अमली पदार्थाचा विळखा तरुणाईला धोकादायक – आमदार चेतन तुपे

अमोल भोसले,उरुळी कांचन –

तरुणांनी अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे या उद्धेशाने फौंडेशन फॉर ड्रग फ्री वर्ल्ड या संस्थेद्वारे अमली पदार्थ विरोधी जागृती अभियान संपूर्ण पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याद्वारे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती ,समाजसेवक, डॉक्टर, पोलीस, पत्रकार , शासकीय अधिकारी यांना या अभियानामध्ये सामावून घेऊन समाजामध्ये अमली पदार्थ विरोधी चळवळ सुरु करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे असे अमली पदार्थ विरोधी जागरुकता अभियानाचे स्वयंसेवक प्रवीण मोरे यांनी सांगितले .

या अभियानाअंतर्गत हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांना याची माहिती देण्यात आली. व अभियानास प्रारंभ करण्यात आला. ” आज तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता व अमली पदार्थाचे होणारे वाढते सेवन लक्षात घेता अमली पदार्थाचा विळखा आजच्या तरुणाईला विकासापासून दूर नेऊ शकतो . असे चेतन तुपे यांनी सांगितले व या अभियानास चेतन तुपे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी या अभियानाचे स्वयंसेवक प्रवीण मोरे यांनी चेतन तुपे यांना माहितीपर पुस्तिका आणि सी डी भेट दिली.

1

आंबेगाव तालुक्यात ४१ हजार ६१० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

सिताराम काळे घोडेगाव

आंबेगाव तालुक्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणा-या २५ ग्रामपंचायतीसाठी ७६.९९ टक्के मतदान झाले. यात १९ हजार ७२५ महिला तर २१ हजार ८८५ पुरूष अशा एकुण ४१ हजार ६१० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर सर्व आवश्यक यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारांच्या रांगा लागल्या तरीही शारीरिक अंतराचे पालन ठेवूनच मतदान करून घेतले जात होते. मतदान केंद्रात चेह-यावर मास्क पाहूनच व सॅनिटायझर लावून मतदारांना आत सोडले जात होते. मतदान शांततेत व्हावे यासाठी ठिकठिकाणी पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर पोलीस वाहने फिरून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करीत होती.

1

आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कलम १४४ लागू

सिताराम काळे घोडेगाव

आंबेगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायत निवडणुकीची १८ जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नागरिकांनी गर्दी केल्यास त्यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेशान्वये कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा, इशारा घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी दिला आहे.

तालुक्यात दि. १८ रोजी विजयी गटातील उमेदवार, कार्यकर्ते, समर्थक मोठया प्रमाणात एकत्रीत येवून ते आपल्या विजयी उमेदवारांची विजयी मिरवणुक, रॅली काढणे, पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडणे, विरोधी गटातील कार्यकर्त्यांच्या अंगावर गुलाल उधळणे, परवानगी शिवाय बॅनर, फ्लेक्स लावणे याप्रकारे कृत्ये करू शकतात.

या पार्श्वभूमिवर दोन गटांमध्ये किंवा दोन जातींमध्ये, धर्मांमध्ये वाद निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक असल्याने नागरिकांनी दि. १८ रोजी गर्दी करण्यास प्रतिबंध करणे आवश्ये असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस व इतर प्रशासनाला दिले आहे.

तसेच ढाबे, हॉटेल, पान टप-या इत्यादी दि. १८ ते १९ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर कलम १८८ मधील तरतुदी व प्रचलित कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.

1

घोडेगाव बसस्थानकात महिलेच्या बॅगमधील ३० हजार रुपयाची रक्कम अज्ञात चोरट्यांने लांबविली

प्रमोद दांगट, निरगुडसर

मुंबई येथे आपल्या मुलाकडे निघालेल्या महिलेच्या बॅगमधील ३० हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घोडेगाव बस स्थानकावर घडली आहे. याबाबत कांता कैलास फलके ( वय ६२ रा.आंमोडी रामवाडी ता.आंबेगाव जि.पुणे ) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की फिर्यादी कांता फलके यांचा मुलगा कामानिमित्त मुंबई येथे राहत असून त्याला काही कामानिमित्त पैशाची गरज होती त्याने आपल्या आईला पैसे घेऊन येण्यासाठी सांगितले होते.कांता फलके या मंगळवार दि.१२/१/२०२० रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ३० हजार रुपये रोख रक्कम घेऊन घोडेगाव बस स्थानकावर आल्या होत्या. त्यावेळी त्या मुंबई मध्ये जाणाऱ्या बस मध्ये चढल्यानंतर त्यांनी कंडक्टरला बस कोणत्या मार्गे जाणार आहे असे विचारले कंडक्टरने बस खाडीपूल मार्गे जाणार आहे असे सांगितले फिर्यादी फलके यांना खाडी पूल मार्गे जायचे नसल्याने त्या खाली उतरल्या खाली उतरल्यानंतर त्यांना त्यांच्या बॅगेची चैन अर्धवट उघडी असल्याचे दिसले.त्या वेळी त्यांनी बॅगमध्ये पाहिले असता त्यांना रक्कम सापडली नाही त्यांनी आजूबाजूला पाहिले असता त्याना त्यांचे पाकीट मिळाले नाही. त्या ज्या बसमध्ये चढल्या होत्या ती बस निघून गेली होती. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की बसमध्ये चढल्यानंतर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये रोख रक्कम असलेले पाकीट व घरपट्टीच्या पावत्या चोरून नेल्या आहेत. याबाबत त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास घोडेगाव पोलिस करत आहे.

1

मंचर बसस्थानकात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

प्रमोद दांगट , निरगुडसर

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंचर बस स्थानकावर गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुण मंचर पोलिसांनी अटक केली आहे. श्रीकांत उर्फ पिल्या संदीप राजगुरू (वय वर्षे १९ रा. नारोडी ता. आंबेगाव जि. पुणे ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की गुरुवार (दि. 14) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोलीस सब इन्स्पेक्टर सागर खबाले, पोलीस कॉन्स्टेबल पी एच मराडे, पोलीस नाईक नवनाथ नाईकडे ,पोलीस स्टेशन येथे हजर असताना पोलीस सब इन्स्पेक्टर खबाले यांना बातमीदार मार्फत बातमी मिळाली की मंचर बस स्थानकावर एक पांढरा रंगाचा शर्ट व काळे रंगाची पॅंट परिधान केलेला तरुण संशयित उभा असून तो कोणत्यातरी उद्देशाने तिथे उभा आहे .

याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कोरे यांनी याबाबत घटनास्थळी जाऊन पाहण्यास सांगितले. त्यावेळी संबंधित पोलिस स्टाफ त्याठिकाणी गेले असता वरील वर्णनाचा तरुण बस स्थानकावर शौचालयाचे आडोशाला उभा होता. यावेळी पोलिसांनी त्याला त्याचं नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव श्रीकांत उर्फ पिल्या संदीप राजगुरू वय वर्षे 19 राहणार नारोडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे सांगितले. यावेळी पोलिसांनी त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २५,००० रुपये किमतीचा गावठी कट्टा मिळाला आहे.पोलिसांनी गावठी कट्टा ताब्यात घेऊन तरुणाला ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक नवनाथ नाईकडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर सागर खबाले करत आहे.

1

कचऱ्याचे ढीग तत्काळ हटवा अन्यथा आंदोलन खासदार कोल्हे व आमदार तुपे यांचा महापालिका प्रशासनाला इशारा

अमोल भोसले,पुणे

हडपसर रामटेकडी कचरा प्रक्रिया प्रकल्पातील ओपन डम्पिंग बंद करून तेथील कचऱ्याचे ढीग तत्काळ हटवा अन्यथा कायदेशीर मार्ग अवलंबण्याबरोबरच आंदोलन करण्याचा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार चेतन तुपे यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

रामटेकडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. त्यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत, याची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे, आमदार तुपे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीच्या वेळी त्यांच्या समवेत नगरसेवक योगेश ससाणे, अशोक कांबळे, नगरसेविका वैशाली बनकर, नंदाताई लोणकर, माजी नगरसेवक फारुक इनामदार, सुनील बनकर, स्वीकृत सदस्य अविनाश काळे, परिसरातील सोसायट्यांचे व कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कचरा प्रक्रिया केंद्राला अचानक भेट दिल्यामुळे तिथे साठवलेल्या कचऱ्याचे डोंगर दृष्टीपथास पडताच डॉ. कोल्हे यांना वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी प्रकल्प राबविणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कचऱ्यावरील प्रक्रिया अशारितीने केली जाते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इथे कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसून एक-दोन मशीन्सद्वारे केवळ कचरा क्रश करण्यात येत असल्याचे स्पष्ट दिसत होते. शिवाय दैनंदिन आणला जाणारा कचरा व प्रक्रिया करण्याची क्षमता यात मोठी तफावत असल्याने कचऱ्याचे डोंगर उभे राहात असल्याचे स्पष्ट दिसून आले.

रामटेकडी कचरा प्रक्रिया प्रकल्पांची अवस्था गंभीर असल्याचे जाणवतात डॉ. कोल्हे यांनी पुणे मनपा आयुक्त श्री. विक्रम कुमार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. दोन महिन्यांपूर्वीच्या बैठकीत चार दिवसात सर्व कचरा हलविण्यात येऊन ओपन डम्पिंग बंद केले जाईल असे आश्वासन दिले होते याची आठवण करून देत कचऱ्याचे ढीग हटवले तर नाहीच उलट आणखी कचरा आणून टाकण्यात आला असल्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. तसेच तत्काळ कारवाई करुन ओपन डम्पिंग बंद करून कचऱ्याचे ढीग न हटवल्यास एनजीटीकडे दाद मागू पण त्याचबरोबर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार तुपे यांनी दिला.

1

वडगाव कांदळी येथे मतदारांना पाच लिटरचे तेलाचे कँड वाटून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भोरवाडी, वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे मतदारांना पाच लिटर चे सोयाबीन तेलाचे कँड वाटप करत असताना पोलिसांनी रंगेहात पकडल्याने येथील दोन जणांवर नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वडगाव कांदळी येथील महाविकास आघाडी पॅनल चे कुंडलिक रामभाऊ सोनवणे व साहिल अनील भोर (राहणार वानेवाडी व भोरवाडी) या दोन जणांवर निवडणूक प्रचाराच्या आदेशाचे पालन न केल्याने तथा आचारसंहितेचा भंग केल्यामुळे भा.द.वि. कलम १७१ (इ), १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना देविदास दगडू भोर (राहणार भोरवाडी) यांच्या घरात घडली.

या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल योगेश दामोदर गारगोटे यांनी दिली. असून बुधवार दिनांक १४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वरील दोघांनी महाविकास आघाडी पॅनलच्या उमेदवारांना मतदान करावे या उद्देशाने देवीदास दगडू भोर यांना पाच लिटर मापाचे तेलाचे तीन कँड देत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले.

भोरवाडी येथे मतदारांना वस्तूंचे वाटप होत असल्याबाबतची माहिती नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना समजली होती. या माहितीवरून त्यांनी त्याचवेळी निवडणूक बंदोबस्ताच्या निमित्ताने वडगाव कांदळी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ ही कारवाई केली. या घटनेचा तपास पोलिस नाईक लोंढे करीत आहेत.

1
20,829FansLike
0FollowersFollow
68,557FollowersFollow
0SubscribersSubscribe