सूरज वाजगे यांचा महिलांसाठी मोफत सप्तशृंगी देवी दर्शनाचा उपक्रम

 

नारायणगाव :- (किरण वाजगे)

 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज वाजगे यांनी नवरात्र व कोजागिरीचे औचित्य साधून नुकतेच कोण बनणार नारायणगाव ची होम मिनिस्टर हा खास महिलांसाठी कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमात महिलांसाठी आकर्षक बक्षीसे देखील ठेवण्यात आली होती. याशिवाय या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या नारायणगावातील प्रत्येक महिला भगिनींना श्री क्षेत्र वनी येथील सप्तशृंगी देवीचे दर्शन मोफत करविण्याचा संकल्प केला होता. या अनुषंगाने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताई देवी ची आरती करून व दर्शन घेऊन सुमारे १००० महिला श्रीक्षेत्र वनी येथे सप्तशृंगी देवीच्या रवाना झाल्या.

 

 

याप्रसंगी माजी सरपंच योगेश पाटे, नारायणगाव येथील सरपंच पदाच्या उमेदवार डॉ. शुभदा वाव्हळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, माजी ग्रामपंचायत सदस्या अंजली खैरे, अमर भागवत, अमित कोराळे, सोनल वाजगे, माधवी वाजगे, रोहन वाजगे, कृष्णा वाजगे, विघ्नहर वाजगे, चेतन पाटे, गौतम जांभळे, साई फापाळे, अनिकेत वाजगे, प्रथमेश वाणी, धनेश वारुळे, राजेश गावडे, नवनाथ परदेशी, भरत भुजबळ तसेच हजारो महिला उपस्थित होत्या.
यावेळी डॉक्टर शुभदा वाव्हळ यांनी श्री क्षेत्र वनीला जाणाऱ्या सर्व महिलांना दर्शनासाठी तसेच प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. माजी सरपंच योगेश पाटे यांनीही सुरज वाजगे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान नारायणगावातील महिलांना सुरज वाजगे यांनी देवदर्शन घडविल्यामुळे पॅनल प्रमुख माजी सरपंच योगेश पाटे, संतोष नाना खैरे, संतोष वाजगे, एडवोकेट राजेंद्र कोल्हे, अनिल दिवटे यांच्या नेतृत्वाखालील श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनल च्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous articleवनविभाग जुन्नर मार्फत वन्यजीव सप्ताह निमित्त सर्पदंशाबाबत कार्यक्रमाचे आयोजन