मोदक बनवणे स्पर्धेत रुचिरा मोरे व सुषमा जगताप ठरल्या अव्वल

नारायणगाव :- (किरण वाजगे)

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नारायणगाव येथील श्री गणेशोत्सव मंडळ, वाजगेआळी व रोटरी क्लब नारायणगाव यांच्या वतीने मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रुचिरा आदेश मोरे व सुषमा योगेश जगताप यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

या स्पर्धेसाठी नारायणगाव वारूळवाडी परिसरातील अनेक महिला भगिनींनी रुचकर, स्वादिष्ट मोदक बनवून आणले होते. मोदक बनविताना त्याची चव, तो कशापासून बनवला आहे, कोणते पदार्थ मोदक बनवताना वापरले आहे तसेच स्पर्धेमध्ये मोदक मांडताना कशाप्रकारे सजावट केली आहे या पद्धतीने गुणांकन करण्यात आले. या स्पर्धेसाठी सोन्याची नथनी, चांदीचे मोदक, पैठणी साड्या व गृह उपयोगी वस्तू अशी विविध प्रकारची बक्षीसे ठेवण्यात आली होती.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विकास सोसायटीचे अध्यक्ष संतोषनाना खैरे, उपाध्यक्ष किरण वाजगे दिलीप गांजाळे उर्मिला खानविलकर, मंजुश्री हाडके, राजेश मनोहर वाजगे, जितेंद्र वाजगे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, अध्यक्ष मुकेश वाजगे, तेजस वाजगे, निलेश गोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण सुरेखा वाजगे, शितल ठुसे, रेखा ब्रम्हे मॅडम, तेजस्विनी वालझाडे, वर्षा गांधी, प्रिया घोडेकर, प्रिया कामत, वीणा वाजगे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रांत क्रीडा मंडळातील सदस्य तसेच वाजगेआळी महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

Previous articleपारंपरिक वेषभूषा व ढोल ताशाच्या कडकडाडात जिजाऊ सखी मंच च्या बाप्पांचे विसर्जन
Next articleसाईराम मित्र मंडळाकडून सर्व धर्म समभाव अशी गणरायाला प्रतिज्ञा