साईराम मित्र मंडळाकडून सर्व धर्म समभाव अशी गणरायाला प्रतिज्ञा

कुरकुंभ : सुरेश बागल

कुरकुंभ ( ता .दौंड ) येथे साईराम मित्र मंडळ येथे गणरायाचे मोठ्या उत्साहात थाटामाटात स्वागत केले जाते. यावर्षी आगळा वेगळा उपक्रम म्हणून गणरायासाठी सर्व गणेश भक्तांकडून एक प्रतिज्ञा केलेली आहे.

मी प्रतिज्ञा करतो कि,मी माझ्याकडून कोणत्याही धर्माचा अपमान होईल असं वागणार नाही,मी सर्व धर्मांना सन्मानपूर्वक वागणूक देईल,माझे विचार सर्व धर्म समभाव आहेत मी माझ्या मोबाईल वर चुकून किंवा जाणीवपूर्वक एखाद्या धर्माबद्दल चुकीची किंवा त्या गोष्टीवरून समाजाला त्रास होईल अशी आक्षेपार्य पोस्ट आली तर मी ती पोस्ट किंवा व्हिडीओ लगेचच डिलीट करेल.माझे गाव एकजूट आहे आणि ते टिकवण्याची जबाबदारी आज माझ्यावर आली आहे म्हणून ते टिकवण्याचा आज मी संकल्पपूर्वक निर्धार करीत आहे . असे सांगून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशी घोषणा साईराम गणेश मित्र मंडळा कडून करण्यात आली.

यावेळी साईराम मित्र मंडळाचे
अध्यक्ष – साहिल मुलाणी,
उपाध्यक्ष – आकाश निंबाळकर,
खजिनदार- सागर भागवत,
सह- खजिनदार – अरबाज खान,
सचिव – ऋषिकेश डहाळे, कार्याध्यक्ष – सरताज मुलानी आणि अन्य गणेश भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous articleमोदक बनवणे स्पर्धेत रुचिरा मोरे व सुषमा जगताप ठरल्या अव्वल
Next articleपोलीस नाईक नारायण बर्डे याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल : कायद्याचा रक्षक बनला भक्षक