कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा चांद्रयान-३ हा नयनरम्य देखावा

नारायणगाव :- (किरण वाजगे)

नारायणगाव येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत, ग्रामोन्नती मंडळाच्या कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या वर्षी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चांद्रयान-३ ही नयनरम्य अशी सजावट केली आहे. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. विशेष म्हणजे सर्व सजावट ही टाकाऊ वस्तूंपासून तयार केली आहे.

महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक खेळ, प्रश्नमंजुषा, रांगोळी, मनोरंजन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद भुजबळ यांनी दिली.

Previous articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयामध्ये रांगोळी, मेहंदी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन
Next articleवाजगेआळी गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरात १०८ जणांचे रक्तदान