पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयामध्ये रांगोळी, मेहंदी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन

उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित ‘पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय’ उरुळी कांचन येथे गणेश उत्सवानिमित्त ’सांस्कृतिक विभागाच्या वतीने रांगोळी, मेहंदी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रांगोळी स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक सुरज लडकत व साहिल खेडेकर, मुलींमध्ये प्रथम क्रमांक कु.सेजल जगताप यांनी मिळविले.

मेहंदी स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. सुप्रिया थडके, द्वितीय क्रमांक कु. फिजा शेख व तृतीय क्रमांक कु. सोनल लोंढे यांनी मिळविले.
चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.प्राजक्ता खेडेकर, द्वितीय क्रमांक कु.ऋतिका म्हेत्रे, तृतीय क्रमांक कु.अंजली विटकर यांनी मिळविले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.सुजाता गायकवाड, प्रा. डॉ. समीर आबनावे, प्रा. सौरभ साबळे, प्रा.दिपाली चौधरी, प्रा.अनुप्रिता भोर, प्रा प्रणिता फडके, प्रा रोशनी सुद्रानी, प्रा कमरून्निसा शेख, प्रा.वैशाली चौधरी, प्रा. प्रतीक्षा कोद्रे यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे आयोजन प्रा.शुभागी रानवडे, प्रा.अर्चना कुदळे, प्रा. प्रियांका गोलांडे, प्रा.जेबा तांबोळी, प्रा ताकवणे, प्रा गोते यांनी केले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत, उपप्राचार्य डॉ. अविनाश बोरकर, प्रा.विजय कानकाटे उपस्थित होते. कार्यालयीन अधिक्षक प्रदीप राजपूत तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद व प्राध्यापकेतर कर्मचारी या सर्वांनी विशेष सहकार्य केले.

Previous articleभारतीय मजदूर संघाची विश्वकर्मा जयंती निमित्त कुरकुंभ येथे मोटरसायकल रॅली
Next articleकृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा चांद्रयान-३ हा नयनरम्य देखावा