भारतीय मजदूर संघाची विश्वकर्मा जयंती निमित्त कुरकुंभ येथे मोटरसायकल रॅली

 

कुरकुंभ,सुरेश बागल

१७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंती (राष्ट्रीय कामगार दिन) निमित्त कुरकुंभ (ता. दौंड )एम. आय. डी. सी. येथे भारतीय मजदूर संघाच्या वतीने रॅली काढून परिसरातील कायम, कंत्राटी कामगारांनी एकजुटीने भारतीय मजदूर संघाच्या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी झालेल्या कामगार मेळावा मध्ये मार्गदर्शन करताना भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय महामंत्री मा. रविंद्र हिमते यांनी भारतीय मजदूर संघ ही कामावर संघटना शोषित पिडीत वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत राहुन देशभरात क्रमांक १ चे संघटन म्हणून कार्यरत आहे, राष्ट्र हीत, ऊद्योग हित व कामगार हित हेच धोरण घेवून कामगारां मधील नेतृत्व विकसित करून कामगारांना प्रोत्साहीत करत आहेत. उद्योगाची प्रगतीसाठी व विकासासाठी कामगारांनी प्रयत्न केले पाहिजे तसेच उद्योजकांनी कामगार, कंत्राटी कामगार महत्वपूर्ण घटक आहे, व कामगारांचे योगदान ही महत्त्वाचे आहे, असे समजून कामगारांना वेतन, सेवा सुविधा दिल्या पाहिजेत असे आवहान केले आहे. कायम व कंत्राटी कामगारांच्या मधील आर्थिक दरी कमी करण्यासाठी त्रिपक्षीय प्रयत्न करणे आवश्यक आहे.
तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध विषयांवर चर्चा करताना कंत्राटी कामगारांनी संघटना स्थापन करून न्याय हक्कांच्या करिता जागृत राहून संर्घष करा भारतीय मजदूर संघ तुमच्या सोबत उभा राहिल असे आवहान केले आहे.

विश्वकर्मा जयंती निमित्त सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ, कामगार महासंघाचे झोनल सचिव श्री. सुरेश जाधव, प्रतिरक्षा मजदूर महासंघाचे संजय मेनकुदळे, गणेश टिंगरे, झानेश्वर जाधव, संतोष शितोळे, अण्णा महाजन , विवेक ठकार, अजेंद्र जोशी , महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार उपमहामंत्री संघांचे राहूल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार उपस्थित होते व परिसरातील कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मेळावा चे प्रास्ताविक अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले, व आभार प्रदर्शन राहूल गोरे यांनी केले आहे.

या वेळी हेंकल अॅडीसीव्ह कुरकुंभ पासून मोटरसायकल रॅली व जाहीर मेळावा कारगील इंडिया कुरकुंभ येथे संपन्न झाला, “देश के हित में करेंगे काम काम का लेंगे पुरा दाम ” घोषणा, व उत्साहात आयोजित करून कामगारांना न्याय द्यावा ही अशी मागणी केली आहे. रॅली चे नेतृत्व व नियोजन कारगील इंडिया कामगार कमिटी, ईटनन्स फाईन्स केमिकल कामगार कमिटी, सिल्पा लि कामगार कमिटी, हेंकल अॅडीसीव्ह कामगार कमिटी, होनर लॅब कामगार कमिटी, औरंगाबाद डिसलरी कामगार कमिटी, युनायटेड स्पिरीट कामगार कमिटी, महाराष्ट्र विज कामगार महासंघ, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ , API /IEC न्युमॅटिक्स कामगार कमिटी यांनी केले आहे. पण

Previous articleवीज कंत्राटी कामगारांना वीस हजार रुपये प्रति महिना पगार देण्याची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची मागणी
Next articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयामध्ये रांगोळी, मेहंदी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन