बालकांना निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आणि सकस आहाराची गरज-केंद्रप्रमुख अंकुश बडे

गणेश सातव, वाघोली

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडजाई,आव्हाळवाडी(ता-हवेली)येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत माता पालकांमध्ये पौष्टिक आणि सकस आहार संदर्भात जनजागृती करण्यासाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी वाघोली केंद्राचे केंद्रप्रमुख अंकुश बडे सर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.दरम्यान शाळेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठया संख्येने माता पालक उपस्थित होत्या.

तृणधान्ये,कडधान्ये, पालेभाज्या,फळभाज्या,फळे यांचा वापर करून सुग्रास, स्वादिष्ट आणि रुचकर अशा पौष्टिक पाककृती बनवून आणल्या होत्या. कार्यक्रमात बोलताना केंद्रप्रमुख अंकुश बडे यांनी फास्टफूड आणि जंकफूडच्या जमान्यात मुलांच्या योग्य वाढीसाठी सर्व अन्नघटकांची कशी गरज आहे,जे पदार्थ विद्यार्थ्यांना आवडत नाहीत ते त्यांनी खावेत यासाठी वेगवेगळ्या पध्दती कशा अवलंबवाव्या या संदर्भात मार्गदर्शन करुन वैविध्यपूर्ण उपक्रमासाठी शाळेचे कौतुक हि केले.

शाळेतील शिक्षक गणेशानंद दराडे व सुरेखा खोसे मॅडम यांनी पौष्टिक व सकस आहार विषयाबाबत पालकांशी संवाद साधला.माता पालकांच्या वैविध्यपूर्ण पाककृतींचा पाहुणे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आस्वाद घेतला. सर्वच पाककृती सुंदर होत्या पण त्यात प्रथम क्रमांक निता सपकाळ(पाककृती- भाजणीचे थालिपीठ) द्वितीय क्रमांक मीरा खेडकर (पाककृती-हिरव्या मूगाचे लाडू),तृतीय क्रमांक सिमा मुळीक (पाककृती-बाजरीच्या पुऱ्या)आणि उत्तेजनार्थ प्रिती यादव (पाककृती-बीट घालून शिरा) यांचा घोषित करण्यात आला.

पाककृती स्पर्धा नियोजनासाठी सुरेखा खोसे मॅडम,वैष्णवी सातव मॅडम यांनी परिश्रम घेतले.मुख्याध्यापक शंकर बडे यांनी सर्वांचे आभार मानले व नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous articleसुदर्शन युवा मित्र मंडळ आयोजित ‘सोरतापवाडी गणेश फेस्टिवल’चे उद्घाटन आ.राहूलदादा कुल यांच्या हस्ते संपन्न
Next articleश्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेस 30 लाखाचा नफा : सभासदांसाठी 13% लाभांश देण्याचा निर्णय – संतोष भास्कर