श्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेस 30 लाखाचा नफा : सभासदांसाठी 13% लाभांश देण्याचा निर्णय – संतोष भास्कर

घोडेगाव –

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अग्रगण्य असलेल्या श्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे संस्थापक /चेअरमन पुरुषोत्तम खंडू भास्कर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नुकतीच संपन्न झाली. पतसंस्थेचे अहवाल वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भास्कर यांनी केले.पतसंस्थेचे 26 वे वर्ष असून पतसंस्थेकडे ३ कोटी १ लाख रुपयांचा निधी आहे ,तर 6 कोटी 64 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. पतसंस्थेने 5 कोटी 84 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असून 3 कोटी 97 लाख रुपयांची संस्थेची गुंतवणूक आहे ,तर चालू आर्थिक वर्षामध्ये पतसंस्थेला 30,04,112 /- तिस लाख चार हजार एकशे बारा रूपयांचा रुपयांचा नफा झाला असून सभासद बांधवांसाठी 13% लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पतसंस्थेला सतत ऑडिट वर्ग अ आहे. तर पतसंस्थेची थकबाकी 0.22% आहे ही कौतुकास्पद बाब असल्याने सर्व सभासद बांधवांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी शारदा प्रबोधिनिचे संस्थापक /अध्यक्ष ह.भ.प पांडुरंग महाराज येवले,माजी सभापती सखाराम घोडेकर, आ.ता.वि.वि मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे,अजित काळे, जयसिंगराव काळे,सखाराम काळे पाटील,वसंत भाऊ काळे,शरद बँकेच्या संचालिका रुपाली झोडगे,अनुसया महिला उन्नती केंद्राच्या संचालिका ज्योती घोडेकर,कृषि उत्पन्न बाजार समिती मंचरचे संचालक रत्ना गाडे,घोडेगावच्या सरपंच अश्विनी तिटकारे,उपसरपंच सोमनाथ काळे,कायेदविषयक तज्ञ सल्लागार ॲड.अनिल पोखरकर,आ.ता.वि.वि मंडळाचे उपाअध्यक्ष श्याम शेठ होनराव,गणेश भास्कर, ज्येष्ठ पत्रकार विकास गाडे सुनील झोडगे,अशोक डोके,जोशी मामा,संदीप घोडेकर,विजय काळे सर व पतसंस्थेचे सर्व संचालक सल्लागार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सभासद बांधवांनी व प्रमुख अतिथींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भास्कर यांनी केले.

Previous articleबालकांना निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आणि सकस आहाराची गरज-केंद्रप्रमुख अंकुश बडे
Next articleबी.डी.काळे महाविद्यालयात रानभाज्या व रानफळे प्रदर्शन संपन्न