बी.डी.काळे महाविद्यालयात रानभाज्या व रानफळे प्रदर्शन संपन्न

घोडेगाव – मोसीन काठेवाडी

घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच चौथे रानभाज्या व रानफळे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन आंबेगाव तालुका कृषी अधिकारी मा. संजना इंगळे यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाले.त्यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात भरडधान्य,तृणधान्य व रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच तृणधान्य, भरडधान्य व रानभाज्यांचा आहारात समावेश करावा. रानभाज्यामध्ये औषधी गुणधर्म आहे.आंतरराष्ट्रीय संघटनेने 2023 हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे तृणधान्याला जगभर राजाश्रय मिळालेला आहे.असे त्यांनी विद्यार्थ्यांना प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.तुकाराम नामदेवराव काळे हे होते.त्यांनी संबोधित केले की,विद्यार्थ्यांनी रानभाज्यांची जाहिरात केली पाहिजे.आरोग्यास गुणवर्धक, शक्तीवर्धक रानभाज्यांचे महत्व जाणले पाहिजे. दै.लोकमतचे पत्रकार श्री.निलेश काण्णव, प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर इ.नी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री.अक्षय काळे,महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड.मुकुंदराव काळे इ.प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गव्हाळे,प्रा.रविद्र वाळे,न्यू इंग्लिश मेडियमच्या मुख्याध्यापिका मेरिफ्लोरा डिसुझा इ.मान्यवर उपस्थित होते.50 भाज्यांची माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन विद्यार्थ्यानी सादर केले होते. एकूण ७३ विविध रानभाज्या व रानफळे यांचे प्रदर्शन दाखवण्यात आले होते.या प्रदर्शनासाठी विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा.रविद्र वाळे, प्रा.नितिन वाघ,प्रा.विश्वास कोकणे,प्रा.प्रणिता घोडेकर, प्रा.पुजा जगताप इ.शिक्षक उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक प्रा.मृणाली लोणकर यांनी तर सुत्रसंचालन प्रा.अर्चना औताडे यांनी केले.प्रा.राजश्री फलके यांनी आभार मानले .

या प्रदर्शनामध्ये जंगलातील, शेतांच्या बांधावरील तसेच माळरानातील हळद,साबर, चिभडू,आशिंद, टेरा,सापकांदा, रताळू,गोराईचे फुल, कुड्याचे फुल,बेंद्रीच्या शेंगा,रानहळद, बरकी, तोंडाची भाजी, भोकर, खुरसणीचे देठ,केना, कोंबडा, कुर्डू, कवट, आंबोशी,तांदूळशा, आघाडा,टाकला,उन्हाळी चिंचुर्डे, भारंगी,गुळवेल, चाव्याचा बार, शेवग्याची पाने, फुले, शेवळ, फांगुळ, मटारू, कारंजा, पाथरी,फांदीची भाजी, करटोली, बधदा, कपाळ फोडी, चाव्याचे कंद, गुळवेल, करंजा काठेमाठ,आंबट चुका,उंबर, बिबवा,भुईआवळा,दिंडा, पानांचा ओवा, महाकुडा, चिवळ,अंबाडी, सुरण, मायाळू दगडीपाला,बहावा,कोळू, सायरीचे देठ,अमरकंद इ. तसेच अशा विविध रानभाज्या व रानफळे यांचे प्रदर्शन सादर झाले.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी घरून शिजवून आणलेल्या रानभाज्यांच्या मनसोक्त आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Previous articleश्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेस 30 लाखाचा नफा : सभासदांसाठी 13% लाभांश देण्याचा निर्णय – संतोष भास्कर
Next articleवीज कंत्राटी कामगारांना वीस हजार रुपये प्रति महिना पगार देण्याची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची मागणी