पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात खाद्यभ्रमंती स्पर्धेचे आयोजन

उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित, पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन येथे गणेश उत्सवानिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने खाद्यभ्रमंती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब भगत यांच्या हस्ते करण्यात आले. खाद्यभ्रमंती स्पर्धेत २५ स्टॉल लावण्यात आले होते. १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

त्यामध्ये प्रथम क्रमांक -अवंती जाधव ग्रुप, द्वितीय क्रमांक -निकिता जाधव ग्रुप, तृतीय क्रमांक -साहिल खेडेकर ग्रुप आणि प्रांजली यादव ग्रुप, चतुर्थ क्रमांक- सुप्रिया थडके ग्रुप, उत्तेजनार्थ- विवेक साळुंखे ग्रुप आणि प्रतीक्षा मूल्या ग्रुप यांनी मिळविले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. सुजाता गायकवाड, प्रा.सौरभ साबळे, डॉ.अमोल बोत्रे, प्रा.अनुप्रिता भोर, प्रा. प्रणिता फडके, प्रा.वैशाली चौधरी, श्री मोरेश्वर बगाडे यांनी केले. या स्पर्धेच्या नियोजन समितीत डॉ.आप्पासाहेब जगदाळे, डॉ.कमरुन्नीसा शेख, प्रा. प्राजक्ता थोरात, प्रा.गौरी ताकवणे, प्रा.प्रदीप ढवळे, प्रा.वृषाली हिंगणे, प्रा.कल्पना जराड, प्रा.ऋतुजा काळगावकर, प्रा.ऐश्वर्या जाधव, प्रा जेबा तांबोळी, प्रा.ज्ञानेश्वर पिंजारी, प्रा.दिपाली चौधरी, प्रा. डॉ.अर्चना कुदळे, प्रा.कोमल गोते, प्रा.स्नेहल गोते, प्रा.रवींद्र मुंडे, प्रा.भाऊसाहेब तोरवे, प्रा.रोशनी सुंदराणी, प्रा.रोहिणी शिंदे, प्रा.अश्विनी भालेराव, प्रा.रोहित बारवकर, प्रा.बंडू उगाडे, प्रा.अनुजा झाटे, प्रा.प्रतीक्षा कोद्रे, प्रा.रामचंद्र बारटक्के, प्रा.सारिका ढोणगे, प्रा.प्रियांका गोलांडे, प्रा.मेघना जाधव यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमाला खाद्यभ्रमंती समन्वयक म्हणून प्रा. विजय कानकाटे, कार्यालयीन अधीक्षक प्रदीप राजपूत, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी रानवडे यांनी काम पाहिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत, उपप्राचार्य डॉ.अविनाश बोरकर, डॉ.समीर आबनावे, डॉ. निलेश शितोळे यांचे मार्गदर्शन लाभले. विशालदीप महाडिक, बापू जगताप, नवनाथ कांचन, वाघमारे यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Previous articleपोलीस स्टेशन व रोटरी क्लबने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleकलासंस्कृतीच्या माध्यमातून महिलांच्या ढोल ताशां पथकास गणेशोत्सव निमित्त मागणी सर्वत्र कौतुकचा वर्षाव