पोलीस स्टेशन व रोटरी क्लबने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नारायणगाव :- (किरण वाजगे)

जुन्नर चे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशन येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आज सकाळपासून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. येथील पोलीस स्टेशन आवारातील सभागृहात सुमारे १६० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. अशी माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये गणेशोत्सवा निमित्ताने रोटरी क्लब नारायणगावच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक जगदिश आप्पा पाटील, सनील धनवे, विनोद धुर्वे, पोलीस दक्षता समितीच्या सदस्या वैजयंती कोऱ्हाळे, अर्चना पडवळ, प्रीती कुंभार, पोलीस पाटील सुशांत भुजबळ,रेखा गुंजाळ, मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, रोटरीचे अध्यक्ष संदीप गांधी, योगेश भिडे, शिवनेर रक्तपेढीचे संचालक कुऱ्हाडे, तसेच नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव, निमगाव सावा, मंगरूळ, धनगरवाडी, येडगाव, आर्वी, पिंपळगाव, मांजरवाडी, खोडद, हिवरे आदी ठिकाणचे ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी रक्तदान प्रसंगी उपस्थित होते.

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे ७० टक्के अपंग असलेल्या अमोल इंगवले यांनी देखील रक्तदान केले. तसेच एकनाथ कुलकर्णी यांनी या शिबिरात ३८ व्या वेळी रक्तदान केले. याशिवाय महिला भगिनींनी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला असून रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा दहा लाख रुपयाचा विमा पोस्ट इन्शुरन्स द्वारे काढण्यात आला आहे.

Previous articleजिजाऊ सखी मंचच्या आरोग्य शिबिरात ५०० जणांचा सहभाग
Next articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात खाद्यभ्रमंती स्पर्धेचे आयोजन