जिजाऊ सखी मंचच्या आरोग्य शिबिरात ५०० जणांचा सहभाग

नारायणगाव :- (किरण वाजगे)

जिजाऊ सखी मंच गणेशोत्सव मंडळ , आळेफाटा यांच्या वतीने आज सर्व रोग निदान व आरोग्य शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या शिबिरात आळेफाटा व परिसरातील सुमारे पाचशेहून जास्त रुग्णांनी उपचार घेतले. यामध्ये अबाल वृद्ध महिला तसेच परिसरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. हे आरोग्य शिबिर डॉ कथे डायग्नोस्टिक सेंटर आळेफाटा, लोकमान्य हॉस्पिटल पिंपरी चिंचवड, ओम चैतन्य हॉस्पिटल आळेफाटा व आळेफाटा येथील अनेक डॉक्टरांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले.
या शिबिरात महिलांचे विविध आजार तसेच सर्व रोगांंवर मोफत तपासणी व उपचार करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ, डॉक्टर मनोज काचळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी डॉ तेजश्री कणसे, डॉ. महादेव वाणी, डॉ शिवाजी सोनवणे, कथे डायग्नोस्टिक सेंटरचे व्यवस्थापक खिलारी तसेच आळेफाटा परिसरातील सर्वच डॉक्टर आरोग्य शिबिरात कार्यरत होते.
हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी जिजाऊ सखी मंच च्या संचालिका वैशाली देवकर, वैशाली जाधव, अनिता वाणी, मनीषा सोनवणे, दिपाली गडगे, अनुराधा सुपेकर, वर्षा गुंजाळ, हेमा बांगर, निशा शेट्टी, लता वाव्हळ, वृषाली नरवडे, मंगल तितर, मनीषा चोरडिया, सोनल गांधी आदी महिलांनी परिश्रम घेतले.

Previous articleवाजगेआळी गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरात १०८ जणांचे रक्तदान
Next articleपोलीस स्टेशन व रोटरी क्लबने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद