कलासंस्कृतीच्या माध्यमातून महिलांच्या ढोल ताशां पथकास गणेशोत्सव निमित्त मागणी सर्वत्र कौतुकचा वर्षाव

उरुळी कांचन

गणेशोत्सवाची चाहूल लागली की ढोल ताशांचे गजर कानावर पडू लागतात. उत्सवाच्या एक-दोन महिने आधीच कित्येक ठिकाणांवर ढोल ताशा पथकांचा सराव सुरू होतो. मग गणरायाचं आगमन असो किंवा विसर्जन या ढोल ताशांच्या आवाजानं वातावरण भारावून जातं. हवेली तालुक्यातील उरुळी कांचन व परिसरातील महिलांच्या विशेषतः ग्रामीण भागात ढोल ताशांचा डंका पुणे शहरातील लक्ष्मी रस्त्यावर वाजु लागला. उरुळी कांचन परिसरातील १५० महिला एकत्र येऊन कला वाद्य महिलांचे ढोल ताशा पथकाची स्थापना केली. पथकात उच्च शिक्षित डॉक्टर, वकील, शिक्षक, अभियांत्रिकी, गृहिणी, युवतीचा समावेश आहे.

कलासंस्कृती गुप्रच्या संकल्पनेतून महिलांचे ढोलपथक सुरु झाले आहे. संस्कृतीची जोपासना व्हावी शिवकालीन वारसा जपण्यासाठी स्थापना झाल्याचे पथकाच्या वतीने सांगण्यात आले. पथकात वाघोली, लोणी काळभोर, यवत, सहजपूर, कोरेगावमुळ, खामगाव, पाटेठान परिसरातील महिला व युवती आहेत.

प्रशिक्षक म्हणून निखिल धुमाळ, प्रणील पवार काम पाहत आहे. यावेळी ज्योती झुरंगे, सविता कांचन, शिल्पा पाटील, सुरेखा कांचन, योगिता टिळेकर, त्रिवेणी कांचन, नीता खराडे, दिपाली टिळेकर, रोहिणी गाडे, रुपाली चौधरी, रेखा चौधरी, शुभांगी मेमाणे, स्वाती चौधरी, अनिता चौधरी, विजया कोलते, कल्पना वाडेकर, वनिता चांदगुडे, वर्षा ढमढेरे, शारदा गोगावले, रेखा तुपे, साक्षी वाळेकर या सह अनेक युवती, गृहिणी, महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पुरातन काळाशी नाते सांगणाऱ्या ढोल-ताशा, शंख-झांजा आणि ध्वजाशी घट्ट नाळ असणाऱ्या ढोल-ताशा पथकांनी आपल्या वादनातून एका अर्थाने आपली सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे. अशा पथकांचे श्री गणेशापुढील लयबद्ध-तालबद्ध वादन ऐकणे ही जणू पर्वणीच.

Previous articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात खाद्यभ्रमंती स्पर्धेचे आयोजन
Next articleविश्व हिंदू परिषदच्या षष्ठी पूर्ती आणि साबाजी बुवा गणेशोत्सव मंडळाच्या ७५ व्या वर्ष पूर्तीच्या निमित्ताने फदालेवाडी येथे रक्तदान शिबीर