सुदर्शन युवा मित्र मंडळ आयोजित ‘सोरतापवाडी गणेश फेस्टिवल’चे उद्घाटन आ.राहूलदादा कुल यांच्या हस्ते संपन्न

उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील सोरतापवाडी गावातील सुदर्शन युवा मित्र मंडळ आयोजित ‘सोरतापवाडी गणेश फेस्टिवल’चे उद्घाटन आमदार राहूलदादा कुल, आमदार रामभाऊजी सातपुते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक प्रदीपदादा कंद यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. स्वागत समारंभाच्या प्रास्ताविक भाषणात मंडळाची पार्श्वभूमी व वाटचाल याबद्दल सर्व मान्यवरांना माहिती दिली.

हरित अभियान, स्वच्छता अभियान, विकासकामे, सामाजिक आणि पक्षीय कामे, पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीतील नव्याने मिळालेले पद व भविष्यातील जबाबदारी सोबत सोरतापवाडी गावाला नर्सरी क्लस्टर & हब बनविण्याबाबतचा परामर्श आणि मांडणी प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचे आयोजक हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी केली. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक प्रदीपदादा कंद, आमदार आमदार रामभाऊजी सातपुते, आमदार राहुलदादा कुल यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमप्रसंगी हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रविंद्रजी कंद, संचालक प्रकाशदादा जगताप, रोहीदासशेठ उंद्रे, राजारामदादा कांचन, प्रशांतदादा काळभोर, लक्ष्मण केसकर, मा.जि.प.सदस्य महादेवजी कांचन, नानासाहेब आबनावे, मा.सरपंच मिलिंदनाना हरगुडे, मा.सदस्य पु.जि.नि.समिती संतोषजी कांचन, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा सरचिटणीस राहूलजी शेवाळे, भाजपचे तालुका अध्यक्ष शामभाऊ गावडे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष पुनम चौधरी, जयप्रकाश बेदरे, स्वप्नील उंद्रे, अमोल शिवले, पूर्व हवेली तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी माजी पदाधिकारी, महिला वर्ग, तरुण वर्ग, सह सर्व सहकारी, पक्ष पदाधिकारी सोबत मित्र परिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कॉमेडी तडका होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, महाराष्ट्र माझा लोकधारा, मोरुची मावशी नाटक, शिवलिलाताई पाटील यांचे कीर्तन, डान्स व मिमिक्री स्पर्धा, झंकार अंक्रिस्ट्रा, प्रेम करावं पण जपून नाटक, शिवानीचा नाद खुळा लावणी, सत्यनारायण महापुजा असे भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती सुदर्शन युवा मित्र मंडळचे अध्यक्ष सुहास चौधरी यांनी सांगितले.

Previous articleपूर्व हवेली तालुक्यातील अष्टापूर याठिकाणी वृक्षारोपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांच्या हस्ते
Next articleबालकांना निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आणि सकस आहाराची गरज-केंद्रप्रमुख अंकुश बडे