पूर्व हवेली तालुक्यातील अष्टापूर याठिकाणी वृक्षारोपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांच्या हस्ते

उरुळी कांचन

पर्यावरणाचा समतोल नीट राहण्यात वृक्ष महत्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी वृक्षांचे महत्व समजून घेऊन वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. यासंदर्भात वृक्षारोपण सारख्या स्तुत्य उपक्रमास आमच्या विभागाने भर दिला आहे. पावसाळ्याच्या अगोदर अष्टापूर या ठिकाणी सर्व ग्रामस्थाच्या सहकार्याने जास्तीत जास्त वृक्षारोपणास भर दिला असल्याचे मत पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांनी सांगितले.

पूर्व हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील खंडोबाचा माळ या ठिकाणी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे व ग्रामपंचायत अष्टापुर व पाटील कंट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने अष्टापुर गावातील न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सहकार्याने व महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग पुणेचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या संकल्पनेनुसार व अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, जिल्हा परिषदेच्या सदस्या कल्पना सुभाष जगताप, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांच्या मार्गदर्शनाने यांच्या हस्ते भव्य वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे एस एम बलशेटवार, कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे प्रदिप लव्हटे, सरपंच अश्विनी नवनाथ कोतवाल, उपसरपंच गणेश दशरथ कोतवाल, माजी सरपंच श्रीहरी कोतवाल, माजी सरपंच कविता योगेश जगताप, माजी उपसरपंच सोमनाथ माणिक कोतवाल, माजी उपसरपंच सुभाष कोतवाल, माजी उपसरपंच कालिदास कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य संजय भिकू कोतवाल, अलका संजय कोतवाल, पुष्पा सुरेश कोतवाल, कविता गणेश कोतवाल, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी घोगरे त्यांचे सर्व शिक्षक सहकारी विद्यार्थी व अष्टापूर मधील ग्रामस्थ किरण कोतवाल, पाटील कंट्रक्शनचे सर्वेसेवा शिनगारे पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर भागवत सवादे त्यांचे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत अष्टपुरचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प.स.मा.सदस्य सुभाष जगताप यांनी केले तर आभार सरपंच अश्विनी कोतवाल यांनी मांडले.

Previous articleपुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने अनेक सामाजिक स्तुत्य उपक्रमानी संपन्न
Next articleसुदर्शन युवा मित्र मंडळ आयोजित ‘सोरतापवाडी गणेश फेस्टिवल’चे उद्घाटन आ.राहूलदादा कुल यांच्या हस्ते संपन्न