पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने अनेक सामाजिक स्तुत्य उपक्रमानी संपन्न

उरुळी कांचन

पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार बाळासाहेब कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विध्यर्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हवेली तालुका शिवसेना युवा नेते पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व उरुळी कांचन तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अलंकार कांचन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अलंकार कांचन मित्रपरिवाराच्यावतीने उरुळी कांचन येथील शाळेमध्ये त्यामध्ये एंजल इंग्लिश मीडियम स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, उन्नती कन्या विद्यालय, डॉ सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूल, आदर्श प्री प्रायमरी स्कूल, किलबिल प्री प्रायमरी स्कूल, बटरफ्लाय प्री प्रायमरी स्कूल, किड्स प्लॅनेट प्राइमरी स्कूल या शाळेमधील तीन गटांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये सहाहजार हुन जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

विजेत्या विद्यार्थी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला मोठया संख्येने विद्यार्थी व पालक व शिक्षक उपस्थित होते.

महावीर मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप बोरमलनाथ गोशाळा येथे चारा वाटप करण्यात आले. उरुळी कांचन येथील नागरिकांची होत असलेली गैरसोयी पाहता महा-ई-सेवा केंद्र चे उद्घाटन माजी सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांच्या हस्ते करून आज वाढदिवसानिमित्त नवीन आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती चा कॅम्प घेण्यात आला.

उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे सल्लागार संतोष कांचन, सरपंच भाऊसाहेब कांचन, उपसरपंच सिमा कांचन, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांचन, अमित कांचन, शंकर बडेकर, युवराज कांचन, सुनिल दत्तात्रय कांचन, आदित्य कांचन, सागर कांचन, सुभाष टिळेकर, ग्रामविकास अधिकारी, सर्कल मॅडम नूरजहाँ सय्यद, तलाठी भाऊसाहेब व कर्मचारी व अलंकार कांचन पाटील मित्र परिवार तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी पंचक्रोशीतील नागरिक व तरुण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleविक्रांत पतसंस्थेची अल्पावधीत गरुड झेप – संतोषनाना खैरे
Next articleपूर्व हवेली तालुक्यातील अष्टापूर याठिकाणी वृक्षारोपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांच्या हस्ते