स्वर्गीय कै.सखुबाई यशवंत फलके फाऊंडेशन मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम

घोडेगाव – मोसीन काठेवाडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगावच्या सर्व विद्यार्थ्यासाठी कैलासवासी सौ.सखुबाई यशवंत फलके फाउंडेशन तर्फे गणेशोत्सवानिमित्त श्री गणपतीच्या मूर्ती बनवणे या उपक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना मोफत श्री गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या व त्यासाठी वॉटर कलर उपलब्ध करून देण्यात आले.याबद्दल श्री धनंजय यशवंत फलके उपसरपंच ग्रामपंचायतअमोंडी व प्रोपरायटर हॉटेल आशिर्वाद तसेच संचालक कैलासवासी सखुबाई यशवंत फलके फाऊंडेशन यांचे अभार मानण्यात आले.श्री गणेश मुर्ती रंगविणे यात सर्व इयत्तांमधील एक ते चार क्रमांकाच्या विद्यार्थ्याना पारितोषिक वितरण करण्यात आले.

यावेळी आंबेगाव शाहीर संघटना अध्यक्ष श्री सखाराम घोडेकर सामाजिक कार्यकर्ते श्री खंडूशेठ घोडेकर श्री . विलासकाका मुथियान, शाहीर नामदेव घोडेकर, अलका चासकर सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते .श्री अमोल डोके यांनी सर्व विदयार्थ्याना केळी वाटप केल्या.विद्यार्थ्यानी श्रीगणेशाची सामुदायिक आरती केली.मराठा मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव यांचे सहकार्य लाभले.

Previous articleविश्व हिंदू परिषदच्या षष्ठी पूर्ती आणि साबाजी बुवा गणेशोत्सव मंडळाच्या ७५ व्या वर्ष पूर्तीच्या निमित्ताने फदालेवाडी येथे रक्तदान शिबीर
Next articleपारंपरिक वेषभूषा व ढोल ताशाच्या कडकडाडात जिजाऊ सखी मंच च्या बाप्पांचे विसर्जन