पारंपरिक वेषभूषा व ढोल ताशाच्या कडकडाडात जिजाऊ सखी मंच च्या बाप्पांचे विसर्जन

आळेफाटा :- (किरण वाजगे)

लेझीम, ढोल ताशांच्या पारंपारिक वाद्याबरोबरच महिलांनी फेटे बांधून आकर्षक पद्धतीने केलेली नऊवारी साड्यांची वेशभूषा, तसेच ट्रॅक्टरवर सजवलेल्या रथामध्ये आळेफाटा येथील जिजाऊ सखी मंचच्या गणरायाचे सातव्या दिवशी उत्साहात विसर्जन करण्यात आले.

या प्रसंगी छत्रपती हायस्कूल, सनी क्रीडा मंडळ पिंपळवंडी, हिरकणी महिला लेझीम पथक, दुर्गामाता महिला पथक वडगाव आनंद, व नारायणगाव येथील विक्रांत क्रीडा मंडळाचे आकर्षक ढोल ताशा पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते . आळेफाटा बस स्थानक चौकात मिरवणूक आल्यानंतर तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक बडगुजर, महिला उपनिरीक्षक रागिनी कराळे, तसेच ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणारे पोलीस हवालदार फलके व विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

मिरवणूक यशस्वी करण्यासाठी जिजाऊ सखी मंच च्या संचालिका वैशाली देवकर, वैशाली जाधव, अनिता वाणी, मनीषा सोनवणे, पुनम हाडवळे, दिपाली गडगे, अनुराधा सुपेकर, वर्षा गुंजाळ, हेमा बांगर, निशा शेट्टी, लता वाव्हळ, वृषाली नरवडे, मंगल तितर, मनीषा चोरडिया, सोनल गांधी, अमृता गडगे, पुनम गुगळे, प्रियांका गडेवाल, प्रांजल भाटे, सुंदर ताई कुऱ्हाडे, हेमलता जाधव अनिता कोकाटे आदी महिलांनी परिश्रम घेतले.

Previous articleस्वर्गीय कै.सखुबाई यशवंत फलके फाऊंडेशन मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम
Next articleमोदक बनवणे स्पर्धेत रुचिरा मोरे व सुषमा जगताप ठरल्या अव्वल