Tuesday, October 27, 2020
Home Blog Page 3

वाडा येथे कोरोना यौद्धांना कोरोना किटचे वाटप

राजगुरूनगर- वाडा (ता.खेड) येथे पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, सलून व्यावसायिक यांना आज वाडा कडूस गटाच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ तनुजाताई घनवट यांच्या हस्ते ‘कोरोना किट ‘ चे वाटप करण्यात आले.

वाडा ग्रामपंचायतला 17 सॅनिटायझर स्टॅन्ड, 5 लिटरचे एक कॅन, व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सलून व्यावसायिक यांना प्रत्येकी एक एक कोरोना किट देण्यात आले. त्यावेळी वाडा ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट यांचा सत्कार करण्यात आला. सर्व कार्यक्रम सोशल डिस्टन्स ठेवून करण्यात आला.

हॉटेल मराठा फॅमिली रेस्टॉरंट च्या दुसऱ्या शाखेचे उद्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

खेड तालुक्यातील खवय्यांसाठी पर्वणी असलेले हॉटेल मराठा व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलची दुसरी शाखा मोशी येथे सुरु होणार असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या हॉटेलचे उद्घाटन संपन्न होणार आहे.

हॉटेल मराठा यांची पहिली शाखा पुणे नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्याजवळ असून व्हेज, नॉनव्हेज चे उत्तम प्रकारचे ताजे जेवण मिळण्याचे ठिकाण म्हणून हॉटेल मराठा’ची ओळख आहे.

उद्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोशी जाधववाडी येथे हॉटेल मराठा शाखेचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे निमंत्रण अंकुशशेठ रामदास जरे ,बबनशेठ लक्ष्मण होले, रंजीतशेठ सखाराम जरे, सोमनाथशेठ बाळू टोपे,सुरज अंकुष जरे, सार्थक अंकुश जरे यांच्या वतीने देण्यात आले आहे.

निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी अहोरात्र झटणारी नवदुर्गा कल्याणीताई पवार

कल्याणी ताई पवार यांचे माहेर खेड तालुक्यातील पूर येथील असून त्यांना तरुण वयापासूनच सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली होती.समाजासाठी आपण काहीतरी करावे यासाठी त्यांनी दहा वर्षापूर्वी द्वारका सेवा सदन वृद्धाश्रमाच्या माध्यमातून निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम सुरू केले आहे.

समाजात अनेक निराधार वृद्ध महिला,पुरुष,असून त्यांच्यासाठी आपणही काहीतरी करावे या भावनेतून त्यांनी दहा वर्षापूर्वी द्वारका वृद्धाश्रम सुरू केले कोणतीही शासकीय मदत न घेता स्वतःच्या हिमतीवर त्यांनी आज पर्यंत वृद्धाश्रम सुरू ठेवले आहे.तसेच वृद्धाश्रमात असलेले वृद्ध महिला व पुरुष यांच्या हाताला त्या काम ही देत आहेत. कल्याणी पवार या स्वतः पदवीधर डॉक्टर असून इतर सामाजिक कार्यातही त्या अग्रेसर असतात. अडचणीत असलेल्यांना मदत करणे, ज्येष्ठांना शासकीय सुविधा, आरोग्य सुविधांचे व कायदेशीर मार्गदर्शनही त्या नेहमी करत असतात त्यांच्या आश्रमात अनेकदा घरगुती वाद झाला म्हणून ज्येष्ठ येत असतात या ज्येष्ठांना सामोपचाराने समजावून व त्यांच्या कुटुंबियांना समजावून अनेक कुटुंबाची भांडणे त्यांनी सोडवले आहेत.

द्वारका आश्रमातील वृद्ध पूर्वी जेवणाचे डबे बनवण्याचे काम करत होते त्यातून त्यांना थोडाफार रोजगार मिळत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने खेड तालुक्यातील अनेक कंपन्या बंद असल्याने यांचा रोजगार बंद झाला आहे. सध्या या वृद्धाश्रमात 12 वृद्ध असून समाजातील दानशूर व सामाजिक संघटनांकडून मदतीची अपेक्षा पवार यांनी केली आहे.

महिला असूनही गेल्या दहा वर्षापासून त्या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठांची सेवा करत आहेत त्यांना अनेकदा अडचणी आल्या त्या अडचणींवर मात करत त्यांनी ही सेवा सुरू ठेवली आहे.त्यांचे हे कार्य खरोखरच प्रेरणादायी असून त्यांचे कार्य इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे. स्त्रीशक्तीची उपासना स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून साजरा केला जाणारा नवरात्र उत्सव या उत्सवानिमित्त कल्याणी ताई पवार व त्यांच्या सारख्या नवदुर्गा महिलांचा समाजाने सन्मान करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

हॉटेल मराठा फॅमिली रेस्टॉरंट दुसऱ्या शाखेचे उद्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

खेड तालुक्यातील खवय्यांसाठी पर्वणी असलेले हॉटेल मराठा व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेल ची दुसरी शाखा मोशी येथे सुरु होणार असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या हॉटेलचे उद्घाटन संपन्न होणार आहे.

हॉटेल मराठा यांची पहिली शाखा पुणे नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्याजवळ असून व्हेज, नॉनव्हेज चे उत्तम प्रकारचे ताजे जेवण मिळण्याचे ठिकाण म्हणून हॉटेल मराठा ची ओळख आहे.

उद्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोशी जाधववाडी येथे हॉटेल मराठा शाखेचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे निमंत्रण अंकुशशेठ रामदास जरे ,बबनशेठ लक्ष्मण होले, रंजीतशेठ सखाराम जरे, सोमनाथशेठ बाळू टोपे,सुरज अंकुष जरे, सार्थक अंकुश जरे,यांच्या वतीने देण्यात आले आहे.

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर मंचर पोलीसांनी कारवाई

प्रमोद दांगट, निरगुडसर

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंचर बेल्हा रोडवर खडकी फाटा येथे टिपर या वाहनातून तीन ब्रास वाळू बिगर परवाना घेऊन जाणारे टिपर चालकावर गस्त घालत असलेल्या मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक २० रोजी मंचर पोलीस ठाण्याचे पो. कॉ. शिवाजी चितारे,पो.ना. रमेश करंडे, हे मंचर बेल्हा रोडवर खडकी गावच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना रोडवर टाटा कंपनीचा टिपर एम. एच.१६ के. वाय. ९८१३ हा मिळून आला यावेळी वाहनांची तपासणी केली असता वाहनात पंधरा हजार रुपयाची तीन ब्रास वाळू मिळाली. यावेळी पोलिसांनी वाहन चालका कडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राहुल पुंडलिक भाईक ( वय २९ रा. कातळवेढा ता. पारनेर जि. अहमदनगर )असे सांगितले.

तसेच त्याच्याकडे वाळू वाहतूक करण्याची कुठलीही परवानगी व रॉयल्टी भरलेली पावती मिळाली नाही. याबाबत मंचर पोलीस ठाण्याची पो. कॉ. शिवाजी चितारे यांनी या वाळू चोरट्या विरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पो. ना. सागर गायकवाड करत आहेत.

अवघ्या साडे पाच वर्षांच्या रोशनी आव्हाळे या चिमुकलीने दुथडी भरलेल्या भीमा नदीला केले पार

प्रमोद दांगट

अनेक दिवसांपासून सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने ओढे व नद्याना पुर आले आहेत. मात्र या परिस्थितीत दौंड तालुक्यातून खळखळून दुथडी भरून वाहणारी भीमा नदीला एका साडे पाच वर्षांच्या मुलीने पार केले आहे.ही नदी पाहूण अनेकांच्या मनात धडकी भरेल अशा परिस्थितीत नदी पात्राच्या जवळ जाण्याचे कोण धाडस करणार नाही.

मात्र दौंड तालुक्यातील कोरेगाव भिवर येथील साडेपाच वर्षांच्या रोशनी आव्हाळे या चिमुरडीने या नदीच्या पाण्यात उडी घेत भीमा नदी पोहत पार करण्याची किमया साधली असल्याने या मुलीचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. तिच्या धाडसाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रोशनी आव्हाळे हिने आपले वडील महेश आव्हाळे यांच्याबरोबर दिड वर्षांची असताना नदीमध्ये पोहण्यास सुरवात केली. अगदी खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये या चिमुकलीने भीमा नदीच्या पुराच्या पात्रात उडी मारत नदी पोहून पार करण्याचे धाडस दाखवले. आणि यात ती यशस्वी देखील ठरली आहे. रोशनी ने नदीचे अथांग पार करीत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

धक्कादायक-चार दारूड्या मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवावा म्हणून  पत्नीला  लोखंडी राँडने बेदम मारहाण,पतीसह चौघा मित्रांवर गुन्हा दाखल

गणेश सातव, वाघोली-पुणे

घरच्यांचा विरोध डावलून अवघ्या ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवविवाहीतेस मद्यपी पतीने मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवायला सांगितले यांस नकार दिलेने पती व त्यांचे मित्रांनी तिला लोखंडी पाईप,पट्टा व हाताने मारहाण केली.यांवरून पतीसमवेत त्याचे चार मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            याप्रकरणी १९ वर्षीय पिडीत नवविवाहीतेने दिलेल्या फिर्यादी वरुन श्रीधर अशोक कदम ( रा. सहजपुर ता दौंड ),विशाल माने,तानाजी शिंदे,करण खडसे,विशाल माने ( पुर्ण नाव,पत्ता माहिती नाही ) यांचेविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत विवाहितेने घरच्यांच्या विरोधात जाऊन २२ जून रोजी आळंदी येथे प्रेम विवाह केला होता. त्यानंतर ते लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीतील एका गावात वास्तव्यास आहेत. पती एका कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणुन काम करायचा परंतू सध्या कोरोना मुळे तो गेलेे चार ते पाच महिण्यांपासून तो घरीच असतो

            पतीला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याचे मित्र सुरज कांबळे, तानाजी शिंदे, करण खडसे, विशाल माने हे दारू घेऊन यायचे व तिचे पतीबरोबर घरामध्ये दारू पित बसायचे. तिने त्यानां बरेच वेळा आमचे घरी येत जाऊ नका असे सांगितले. यांवरून पती तिला हाताने मारहाण करायचा. सोमवार ( १९ ऑक्टोबर ) रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दोघे घरी असताना माने व शिंदे घरी आले. येताना त्यांनी दारूच्या बाटल्या व मटन आणले होते. ती स्वयंपाक करायला लागली तोपर्यंत घराचे हॉल मध्ये ते सर्व दारू पित बसले होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास सर्वांनी जेवण केले. ११ वाजण्याच्या सुमारास ती किचन मध्ये भांडी घासत असताना माने व शिंदे हे तेथे आले व तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तिने नकार दिल्याने पतीने तिच्या पायावर व हातावर लोखंडी पाईपने मारहान केली तर मित्रांनी हाताने मारहाण केली. तिने घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पतीने केसाला धरून ओढून पुन्हा मारहाण केली. त्यावेळी मित्रांनी तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडा – ओरडा ऐकून शेजारी राहणारांनी त्यांना घरातून हाकलून दिले.

           त्याअगोदर १५ दिवसापुर्वी तिचे पतीचे मित्र सुरज कांबळे व करण खडसे हे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दारू घेवून आले होते. जेवण झाल्यानंतर दोन्ही मित्रांनी वरीलप्रमाणे प्रकार केला होता. त्यावेळीही नकार दिल्याने तिला सर्वांनी मारहाण केली होती. पुढील तपास पोलीस हवालदार एस. पी. पवार हे करत आहेत.

होय,आहे आमच्या मनात खंत खेड तालुक्यात राहूनही परप्रांतीय असल्याची-सुप्रियाताई साठे

मी.. सुप्रियाताई साठे ठाकूर (रा.ठाकूर पिंपरी,ता.खेड,जि. पुणे )

बऱ्याच दिवसापासून मनात माजलेल काहूर समाजापर्यंत कस पोहोचवाव हा विचार करत होते. कारण माझं क्षेत्र वक्तृत्वाशी निगडित आणि कोरोना च्या कालावधीत वक्तृत्वाच्या वाटा बंद. म्हणून लेखणी हातात घेण्याचा विचार आला आणि तो तुमच्या पर्यंत पोहोचावा म्हणून हा प्रपंच.

खेड तालुका म्हणजे तरुणांचा तालुका.युवाशक्ती आहे मात्र सर्वत्र विखुरलेली. कोणी या पक्षाचा कार्यकर्ता तर कुणी त्या पक्षाशी बांधील. आत्तापर्यंत सर्वच जणांनी तरुणाईचा वापर मतांसाठी करून घेतला. याच तरुणाईच्या जोरावर आंदोलने घडवली, मात्र ती स्वतःच्या स्वार्थासाठी. या आंदोलनाने तरुणांना बरच काही दिलही, पोलिसांचा मार, गावात इज्जतीचे धिंडवडे,कधीच न संपणाऱ्या पोलीस स्टेशन, कोर्ट, दवाखान्यांच्या खेट्या. यातून तरुणाईने फायदा काय मिळवला ही चिंतनाची बाब आहे.

खेड तालुका निसर्ग सौंदर्याने नटलेला. निसर्ग देवतेने इथे निसर्ग सौन्दर्याची मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे. या तालुक्यात दोन धरणे ही जलदेवतेच्या आशीर्वाची जणू साक्ष देतात. सह्याद्री च्या रांगांनी मध्यस्थी करून वेगळा केलेला कोकण आणि दक्खन याच तालुक्यात. मात्र या ठिकाणांना पर्यटनस्थळे बनवून ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे राज्यकर्ते कमी पडले. धरणांच्या कडेला होऊ शकणारा हॉटेल व्यवसाय कधी तिथल्या तरुणांच्या लक्षात कोणी आणूनच दिला नाही. कारण कार्यकर्ता मोठा झाला की नेत्याला त्रासदायक , म्हणून तर नाही ना..?

खेड तालुक्यात श्रीमंती गजपदाने आली त्याला कारण MIDC. होय, MIDC ने आमच्या दक्षिण भागाला बक्कळ श्रीमंत केले, पण ती श्रीमंती फक्त गाडी, बंगला, सोने, सोहळे हे दाखविण्या इतकीच ? त्या गावांमधील जागा विकताना त्या जागांची किंमत कवडी भावाने मिळाली. इथे आमच्या जागेत सोन पिकणार आहे याची तिळमात्रही कल्पना त्यांना देण्यात आली नव्हती. इथे कॉन्ट्रॅक्ट बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच मिळाले, बाकी सारे उपाशी राहिले. बाहेरच्या तालुक्यातील आमदार, खासदार, गुंड प्रवृत्तीचे लोक इथे मनमानी कारभार दादागिरीने करतात. आमचे राज्यकर्ते इथल्या तरुणांना पाठबळ देण्यास निष्फळ ठरले हे आमचे दुर्दैव. ….

खेड तालुक्यातील भामा आसखेड हे धरण बांधण्यासाठी अनेक लोकांना आपल्या पूर्वजांचा इतिहास, आपल्या जमिनी, घरे, सगळी स्वप्ने धरणात विसर्जित करावी लागली, त्यांनी ती आनंदाने केलीही,मात्र गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात आम्हाला जमिनी मिळाव्यात ही मागणी अजूनही त्यांना भिक्षेकऱ्यासारखी करावी लागते. ज्यांना जमिनी मिळाल्या त्यांच्या पुढार्यांनीच हडप ही केल्या. जमिनी गेल्या पण हक्काचे पाणी पुण्याला गेले, ते अडविण्यात आमचे राज्यकर्ते कमी पडले, अजून उर्वरित पाणी पिंपरी चिंचवड ला नेण्याचे षडयंत्र बाकी आहे ते नेले की पूर्व पट्ट्यातील अनेक गावे ज्यांच्या जमिनी बागायती आहेत आणि त्यावर च त्यांची गुजराण चालते ते शेतकरीही जमीनदोस्त होणार हे निश्चित…..

खेड तालुक्याचं भाग्य थोर च म्हणून तेराव्या शतकातील महान संत ज्यांना विश्व माऊली म्ह्णून संबोधले जाते ते श्रीमंत ज्ञानोबाराय खेड तालुक्यातले, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे भीमाशंकर याच तालुक्यात, पुणे जिल्ह्याचे कुलदैवत असणारे निमगाव दावडी,खरपुडी चे खंडोबा देवस्थान या तालुक्यातले, कुंडेश्वरासारखे मनोहारी, नयनरम्य, डोंगराच्या कुशीत वसलेले देवस्थान याच तालुक्यातले, जागृत असणारी यमाई याच तालुक्यातील, महान संत सटवाजी बाबा देवस्थान इथेच, प्रति भिमाशंकर शंभू देवस्थान इथेच, तुकोबारायांची साक्षात्कार भूमी भामचंद्र डोंगर इथेच, ज्या लाडक्या मुलीसाठी तुकाराम महाराज वैकुंठाहून खाली आले त्या भागीरथी माता याच तालुक्यातल्या येलवाडी गावाच्या, तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी दोन टाळकरी संताजी महाराज जगनाडे, गंगाराम बुवा मवाळ तेही अनुक्रमे सुदुंबरे आणि कडूस गावचे म्हणजे इथलेच, श्रीपती बाबांसारखे त्रिकालज्ञ महात्मे म्हाळुंगे नगरीचे तेही इथलेच बच्चे बाबा उर्फ वाजवणे बाबां सारखे कट्टर वारकरी ही वाजवणे गावचे म्हणजे इथलेच. इतकी महत्वाची तीर्थक्षेत्रे असतानाही त्यांच्याकडे समर्पक पणे लक्ष देऊन त्याबद्दलची माहिती लोकांना सांगून त्यांना प्रसिद्धी झोतात आणता आले नाही.

खेड तालुक्यातीलच नव्हे तर देशातील सर्वच युवकांसाठी स्फूर्ती आणि प्रेरणा स्थान असणारे ज्यांनी आपले नाव देशाच्या इतिहासात रक्तरंजित सुवर्ण अक्षराने लिहिले, देश स्वतंत्र करण्यासाठी जहाल क्रांतीचा मार्ग अवलंबून देशाचा जाज्वल्य अभिमान उरी बाळगून स्वातंत्र्य यज्ञात आपल्या प्राणांची आहुती देणारे हुतात्मा राजगुरू याच तालुक्यातले, आम्हाला मात्र त्यांचा पूर्णपणे विसर पडलाय कारण त्यांचे निवासस्थान. त्यांची चरण कमळे ज्या घराला लागली त्या घराला पाहू गेल्यास लक्षात येते की येणारे पर्यटक त्या घरातील जळमटांबरोबर आमच्या बुद्धीला लागलेली जळमाटेही त्यांना आनंदाने दाखवतो.

खेड तालुक्यामध्ये अनेक माता भगिनीही उत्कृष्ठ रित्या अनेक क्षेत्रात कामे करतात, त्यात कुणी जिप अध्यक्ष, सदस्य, पंस सभापती, उपसभापती, सदस्य, सुत्रसंचालक, डॉक्टर, इंजिनियर, उद्योजिका, शिक्षिका, पोलीस अधिकारी, इतर अधिकारी, किर्तनकार म्हणून आपापल्या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक कमावला आहे, पण त्यांच्या कार्याचा गौरव कधी झाला नाही की कधी तोंड भरून कौतुकांची स्तुतीसुमने त्यांच्यावर उधळल्या गेली नाहीत, हे दुर्दैव. ..

एवढा लेखन प्रपंच करण्याचा एक च मानस आहे तो असा की खेड तालुक्याला इश्वरदत्त देणगी मुबलक प्रमाणात आहे, मग ती युवाशक्ती असो की श्रीमंती, निसर्ग संपत्ती, जल उपलब्धी, तीर्थ क्षेत्रांची महती, स्वातंत्र्य सेनानींची परमगती, पात्र माणसांची मांदियाळी असो. पण या सर्वांचे योग्य ते नियोजन जे आत्ता पर्यंत अपेक्षित होते ते न होता सर्व उपेक्षित राहिले. इथून पुढे तरी सर्वांनी मिळून याचा विचार करावा आणि तालुक्याच्या समृद्धी आणि संपृक्ततेला शोभेल असे कार्य करावे ही अपेक्षा….!

डॉक्टरांसमवेत आरोग्य क्षेत्रातील सर्वचं कर्मचारी रुग्णांसाठी ‘देवदूत’- डॉ.राहुल कराड

गणेश सातव वाघोली

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणकाळांत रुग्णांना वाचविण्यात डॉक्टरांसमवेत आरोग्य क्षेत्रातील सर्व कर्मचारी रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत.कारण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता सुरू असलेल्या लॉकडाऊनसारख्या परिस्थितीतही आपल्या जीवाची व कुटुंबीयांची पर्वा न करता सर्व लोकांनी आपल्या घरात सुखरूप राहावे यासाठी विविध रूपाने,विविध मार्गाने अहोरात्र झटले असल्याने ख-या अर्थाने ते कोरोना योद्धे ठरले आहेत.असे प्रतिपादन माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांनी केले.

   नवरात्रीच्या ७ व्या माळेचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मधील डॉक्टर,नर्स,वाहन चालक, सफाई कामगार आदींनी कोविड महामारीत गेले सहा ते सात महिन्यांच्या कालावधीत अहोरात्र आपल्या जीवाची पर्वा न करता उत्कृष्ट सेवा दिली. या कामातून कोविडचा सामना न घाबरता करा असा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणाऱ्या हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स,नर्स यांचेसमवेत इतर सर्व कर्मचारी यांचा सन्मान कोरोना योद्धा म्हणून डॉ. राहुल कराड व विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ.अदिती कराड यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपस्थितांना ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

            यावेळी डॉ.नामदेव जगताप,डॉ.विजय टेंगळे, डॉ.संदीप शिंदे,डॉ.सुशांत शिंदे,डॉ.छगन खारतोडे,डॉ. पी.के.देशमुख यांचेसमवेत रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

लोणावळ्यात अवैध शस्त्र साठा जप्त,एकाला अटक

लोणावळा-फरारी आरोपीच्या शोधात असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने धडक कारवाई करून दोन पिस्तूल व रेम्बो चाकूसह आरोपीला बेड्या ठोकल्या. ही कारवाई रात्रीच्या सुमारास लोणावळा शहर हद्दीत करण्यात आली. सूरज विजय अगरवाल असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच्या सुमारास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक हे एका फरार आरोपीच्या शोधात असताना पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने लोणावळा येथील कल्पतरू हॉस्पिटल समोरील वर्धमान सोसायटीतील गुरुकृपा डिस्ट्रिब्युटर या गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी येथे असलेल्या सूरज विजय अगरवाल याची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी व काडतुस मिळून आले. तसेच गोडाऊन मधील लोखंडी रॅक मध्ये १ गावठी पिस्तूल, असे एकूण २ पिस्तुल, कोयता व रेम्बो चाकु असा १ लाख ९०० रुपये किमतीचा अवैध शस्त्रसाठा मिळून आला असून पोलिसांनी तो जप्त केला आहे. सदर आरोपी व जप्त केलेला माल गुन्हे शाखेच्या पथकाने लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे. याबाबत अक्षय अजित नवले पोलीस हवालदार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहा पो उपनिरीक्षक दत्तात्रय जगताप, सहा पो उपनिरीक्षक एस के पठाण, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, सुनील जावळे, लियाकतअली, सुधीर अहिवळे, अक्षय नवले, प्रसन्नजीत घाडगे, बाळासाहेब खडके, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने केली.

20,829FansLike
0FollowersFollow
68,396FollowersFollow
0SubscribersSubscribe