सावरदरी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा: सरपंचपदी भरत तरस ; उपसरपंचपदी संदिप पवार यांची बिनविरोध निवड
चाकण- खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव होते. सरपंचपदासाठी भरत तरस व उपसरपंच पदासाठी संदिप बाळासाहेब पवार यांचे एकमेव अर्ज आल्याने सरपंचपदी भरत तरस तर उपसरपंचपदी संदिप पवार यांची बिनविरोध निवड झाल्याने सावरदरी ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकला.
सावरदरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गोंधळजाई परिवर्तन पॅनलने ७-० ने निवडणूक जिंकत २५ वर्षांचे सत्ता परिवर्तन केले होते.
सावरदरी ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. जे. मांदळे व ग्रामसेवक पी. ए. आत्तार यांनी सहायक म्हणून काम पाहिले.
स्वाती सावंत यांची भाजपा महिला मोर्चा शिक्षक पुणे शहरअध्यक्ष पदी निवड
पुणे शहर भाजपाची कार्यकारिणी व सर्वसाधारण सभा (दि 22 ) रोजी भाजप शहर कार्यालय जे एम रोड पुणे याठिकाणी जाहीर करण्यात आली. गेल्या विधानसभा 2019 निवडणूकीत भारतीय जनता पार्टी मध्ये स्वाती सावंत यांनी प्रवेश केला होता तसेच पार्टीमध्ये सर्कीय कार्यक्रर्त्या म्हणून काम करत आहेत. पार्टीने शहर कमिटी मध्ये दखल घेऊन त्यांना महिला मोर्चा- शिक्षक शहरअध्यक्ष हि जबाबदारी दिली आहे.
सौ. स्वाती सावंत ह्या अनेक सामाजिक संस्था मध्ये गेल्या अनेक वर्षापासुन सामाजिक कामात सर्कीय आहे, पती ॲड. संजय सावंत पाटील यांच्या कडे पुणे जिल्हा कायदा आघाडी- जिल्हाअध्यक्ष पदाची जबाबदारी आहे तसेच ॲड. संजय सावंत हे गेली 15 वर्षे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असतात त्यांच्या सोबत सौ. स्वाती सावंत कायमच वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सहभागी होतात.
सौ. स्वाती सावंत यांनी सभेला संबोधले व सर्वाना विश्वास दिला पक्ष संघटन वाढवत आसताना येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमी वर मोठ्या प्रमाणात महिला शिक्षकांचे संघटन करु आशी ग्वाही दिली. तसेच पुढील काळात सर्व शिक्षकांच्या समस्या व सुविधा साठी सरकार कडुन न्याय मिळवुण देण्याचा प्रयत्न करु.
पुणे शहर भाजपाची कार्यकारिणी शहर कार्यालय याठिकाणी जाहीर करण्यात आली. प्रमुख कार्यकारीणी, मोर्चा अध्यक्ष व सरचिटणीस तसेच आघाड्यांचे संयोजक व सहसंयोजक, शहर व जिल्हा कार्यकारणी सदस्य, विशेष निमंञित यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
याप्रसंगी पुण्यनगरी चे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष मा.आमदार जगदीशजी मुळीक, उपाध्यक्ष मा.धनंजय जाधव, उपाध्यक्ष डाँ श्रीपाद ढेकणे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा प्रणिताताई चिखलीकर तसेच पुणे शहर संपुर्ण कमिटी, महिला मोर्चा अध्यक्षा स्थायी समिती सदस्य अर्चनाताई पाटील, वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष मा. संतोष खांदवे, पुणे शहराचे सर्वच विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उपस्थित होते, इत्तर मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला..
मोई विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या संचालकपदी मारुती येळवंडे व विशाल गवारी यांची निवड
सोमनाथ टोपे,चाकण: खेड तालुक्यातील मोई येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री मारुती एकनाथ येळवंडे व विशाल गवारी यांची निवड करण्यात आली.
सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष पै समीरदादा गवारे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ संचालक निवडण्यात आले. या वेळी सोसायटीचे ह्यईसचेयरमन व संस्थेचे सर्व संचालक यांच्या हस्ते दोन्ही संचालकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी भाजपाचे नेते व आदर्श गाव मोईचे माजी आदर्श सरपंच राहुलदादा गवारे , ग्रामपंचायत सदस्य किरण गवारे गोरखबाप्पू गवारे , ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक देविदास मेदनकर गावातील असंख्य तरुण वर्ग कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थित होते. सोसायटीच्या दोन्ही तज्ञ संचालकांचा निवडीबद्दल आदर्श गाव मोई ग्रामस्थांच्या वतीने सचिव निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार करण्यात आला.
शिवरायांच्या मावळ्यांनी दुबईत घराघरात शिवजयंती केली साजरी
राजगुरूनगर- या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर व पुणे च्या दुबईतील शिवरायांच्या मावळ्यांनी “शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात” शिवजयंती साजरी करण्यात आली होती .
शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ हा कार्यक्रम दुबई मधे आयोजन केले प्रत्येकाने घरोघरी मावळ्यांनी व शिवभक्तांनी आनंदाने शिवजयंती साजरी केली .
यामध्ये साईनाथ मांजरे, संदीप कड, अमोल थिगळे , रघुनाथ संगळे पाटील ,अनवर खान, हरीश दौडकर ,दादा पवळे ,विशाल ढमाले, संतोष होले ,अनिकेत कोकरे, अभिजीत देसाई, संदीप निमसे,अभिनदन टावरे ,आजु चोरघे सहभागी झाले होते. तसेच कोरोना महामारी पासून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक शासनाचे नियम पालनाचे आवाहन करून भारतील व महाराष्ट्र राज्यातील पोलीस ,आरोग्य कर्मचाऱ्यांचा उल्लेख मावळे असा करत, महामारी दरम्यान त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची प्रशंसा करण्यात आली.
पुणे जिल्हा परीषदेच्या संयुक्त शाळांना ३ कोटी ६९ लाख रुपयांचे अनुदान मंजुर
सिताराम काळे
– महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग समग्र शिक्षा उपक्रमांतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने सन २०२०-२१ साठी पुणे जिल्हा परिषदेच्या ३ हजार ७२४ शाळांना ३ कोटी ६९ लाख १० हजार रूपये संयुक्त शाळा अनुदान मंजुर झाले असुन यातील ७० टक्के रक्कम तालुका स्तरावर वितरीत करण्यात आली आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत २०२०-२१ वार्षिक कार्ययोजना व अंदाज पत्रकास प्रकल्प मान्यता मंडळाच्या १८ जुन २०२० च्या बैठकीमध्ये संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजुरी मिळाली आहे. सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षकांचे शिक्षण या केंद्रपुरस्कृत योजनांचे एकत्रीकरण करून समग्र शिक्षा अभियान ही योजना सन २०१८-१९ पासून सुरू करण्यात आली आहे. सदरचे संयुक्त शाळा अनुदान हे शासकीय आदिवासी विभागांकडून चालविलेल्या आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाकडून चालविलेल्या शाळा, विदयानिकेतन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांसाठी मंजुर आहे.