१७ लाखाचा त्वरित जमा करा भविष्य निर्वाह निधी पुणेचा ठाकुर सावदेकर आणि कंपनीला दिला आदेश : कष्टकरी बिडी कामगारांना दिलासा

कुरकुंभ :  सुरेश बागल

पुणे येथे कार्यरत असलेल्या ठाकुर सावदेकर आणि कंपनी येथे बिडी उत्पादनाचे काम चालते येथे सुमारे २५० पेक्षा जास्त कामगार बिडी बनवण्याचे काम करतात या पैकी फक्त काही कामगारांनाच पी फ चे अंशदान चालू होते. व ७८ कामगारांच्या पी फ च्या बाबतीत कायद्यानुसार लागु असलेले नियम, फायदे , लाभां पासून वंचित ठेवले होते. ही बाब महाराष्ट्र राज्य बिडी कामगार संघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) च्या निदर्शनास आली. ही बाब संघटनेने कंपनी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिले पण या बाबतीत व्यवस्थापनाने कोणतेही दखल घेतली नाही त्यामुळे दि २९/०६/२०२१ रोजी पी फ कमिशनर ऑफिस पुणे् येथे तक्रार दाखल करून एप्रिल २०१६ ते डिसेंबर २०२१ या कालावधीतील ७८ कामगारांची पी फ रक्कम भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ अन्वये कायदेशीर कारवाई करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी केली.

या बाबतीत पी फ कमिशनर ऑफिस पुणे ने दखल घेऊन श्री. के. भानुप्रकाश व श्री. संजय कोहाड यांची अंमलबजावणी अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यांनी व्यवस्थापन व संबंधीत कामगारांच्या कागदपत्रे, पुरावे यांची छाननी करून त्याचा अवहाल श्री. योगेद्र सिंग शेखावत क्षत्रिय भविष्य निर्वाह आयुक्त पुणे २ यांना सादर केला.

या बाबतीत त्यांनी दि. २८/०६/२०२३ भविष्य निर्वाह निधी कायदातील तरतूदी नुसार ७ ऐ नुसार १७ लाख ३३ हजार ऐकशे सात रू. नियोक्ता कडून देय रक्कम निश्चीत केली. या शिवाय ७ क्यूं नुसार व्याज व १४ बी नुसार दंड करून सर्व रक्कम ४५ दिवसांत जमा करण्यासाठी आदेश दिले आहेत.
या संपूर्ण प्रकरणात भारतीय मजदूर संघाचे सेक्रेटरी उमेश विस्वाद यांनी बिडी कामगारांची बाजु मांडून असंघीटत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळविण्यासाठी विविध ऊद्योगात प्रवास करून कामगारांना न्याय मिळवून देऊ असे बिडी कामगारांच्या झालेल्या मिटींग मधे सांगितले आहे.

Previous articleवीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या करिता स्वतंत्र शेड्युल नुसार सुधारित वेतन दर लागु करावेत : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी
Next articleलायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या अध्यक्षपदी ला.योगेश रायकर