लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या अध्यक्षपदी ला.योगेश रायकर

नारायणगाव :- (किरण वाजगे)

लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचा पदग्रहण समारंभ नुकताच नारायणगाव येथील जयहिंद मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, लिओ डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ला. संदीप मुथा, झोन चेअरपर्सन ला.मिलिंद झगडे, अध्यक्ष ला.योगेश रायकर, मावळते अध्यक्ष ला.संतोष रासने, लिओ अध्यक्ष ला.सुजल रायकर, मावळते लिओ अध्यक्ष ला.सार्थक मुथा उपस्थित होते.

या पदग्रहण प्रसंगी इन्स्टॉलेशन ऑफिसर ला.संदीप मुथा यांनी लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी चे अध्यक्ष ला.योगेश रायकर, सचिव ला.राजेंद्रकुमार देसाई, खजिनदार ला.संजय शिंदे, सर्व संचालक मंडळ व लिओ क्लब ऑफ जुन्नर अध्यक्ष लि. सुजल रायकर, सचिव लि.समीक्षा डुंबरे, खजिनदार लि.प्रणव वाळुंज यांना पदग्रहण करून पदाची जबाबदारी समजून सांगितली. याप्रसंगी त्यांनी वर्षभर कामासाठी शुभेच्छा देऊन इंडक्शन ऑफीसर ला. मिलिंद झगडे यांनी सर्व नवीन लायन्स व लिओ मेंबरला शपथ दिली. तसेच सर्वांना लायन्सचे कर्तव्य,काम व महत्व समजून सांगितले.

या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. लायन्स क्लबच्या कामाचे कौतुक करून त्यांना नेहमी आपल्या कडून जे शक्य आहे ते सहकार्य करू अशी भावनाही व्यक्त करून चंद्रयान मोहिमे बाबत सखोल अशी माहिती आमदार बेनके यांनी सांगितली.

याप्रसंगी जुन्नर रेस्क्यू टीमला या वर्षीचा लायन्स भूषण पुरस्कार देवून आमदार अतुल बेनके व मावळते अध्यक्ष ला.संतोष रासने याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या वेळी टीमचे अध्यक्ष राहुल पातुरकर, रुपेश जगताप, राजकुमार चव्हाण, माग्दूम सय्यद, ताज सय्यद,आतिफ सय्यद,लखन दातार उपस्थित होते.तसेच जुन्नर रेस्क्यू टीमला सहकार्य म्हणून ला.गणेश देशमुख यांचे वडील कै.गोविंदराव जयवंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ ३०००० रुपयाचा चेक सूपूर्त करण्यात आला.जुन्नर रेस्क्यू टीमने जुन्नर तालुक्यात अनेक आपत्तीच्या ठिकाणी महत्वाचे योगदान दिले आहे.

तसेच याप्रसंगी २०२२-२३ वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या लायन्स मेंबरचा सन्मानचिन्ह देवून अध्यक्ष ला.संतोष रासने व पाहुण्याचे हस्ते गौरव करण्यात आला.

या प्रसंगी नूतन अध्यक्ष ला.योगेश रायकर यांनी अध्यक्षीय भाषणात वर्षभर अनेक उपक्रम करण्याचा मानस केला आहे. त्यमध्ये जुन्नर तालुक्यात १००० झाडांचे वृक्षारोपण, संपूर्ण वर्षभरात महारक्तदान शिबिरे,पारुंडे येथील १ एकर जागेवरती अनाथ आश्रम सुरू करण्याचा मानस ही व्यक्त केला तसेच जुन्नर तालुक्यातील सर्वच महाविद्यालय रस्ता सुरक्षा अभियान आयोजित केले जाणार आहे.

या प्रसंगी जुन्नर तालुक्यात अनेक मान्यवर, पत्रकार,डॉक्टर व सर्व लायन्स मेंबर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मावळते अध्यक्ष ला.संतोष रासने, सचिव ला.विश्वास भालेकर, खजिनदार ला.अजित वाजगे, लिओ अध्यक्ष लि.सार्थक मुथा यांनी केले व सूत्रसंचालन ला.हेमंत भास्कर व आभार ला.अजित वाजगे यांनी मानले.

Previous article१७ लाखाचा त्वरित जमा करा भविष्य निर्वाह निधी पुणेचा ठाकुर सावदेकर आणि कंपनीला दिला आदेश : कष्टकरी बिडी कामगारांना दिलासा
Next articleजैन साधू कामकुमारनंद यांच्या हत्येच्या निषेधार्थ नारायणगावात मूक मोर्चा