जैन साधू कामकुमारनंद यांच्या हत्येच्या निषेधार्थ नारायणगावात मूक मोर्चा

नारायणगाव :- (किरण वाजगे.)

कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी जवळील हिरेकाडी येथे दिगंबर जैनाचार्य श्री कामकुमारनंद गुरू महाराज यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ व मुनी सुरक्षेबाबत जुन्नर तालुक्यातील आळेफाटा जुन्नर यासह नारायणगाव येथे या घटनेचा निषेध करण्यात आला.नारायणगाव येथे या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी मूक मोर्चा काढण्यात आला.

नारायणगाव येथील जैन सकल संघ, जैन सोशल क्लबच्या वतीने जैन साधूमुनींच्या हत्तेच्या निषेधार्थ काळ्याफिती लावून मूक मोर्चा द्वारे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अहिंसात्मक आंदोलन करण्यात आले.

नारायणगाव बस स्थानक येथे झालेल्या निषेध सभेमध्ये जैन सकल संघाचे अध्यक्ष अशोक खिवंसरा, उपाध्यक्ष मनोज भळगट, सेक्रेटरी स्वप्निल भन्साळी, जैन सोशल क्लबचे अध्यक्ष धनेश शेलोत, उपाध्यक्ष अभय कोठारी, सचिव शुभम मुथ्था, तसेच जैन सकल संघाच्या महिला मंडळाच्या पदाधिकारी व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नारायणगावच चे माजी सरपंच योगेश पाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे तसेच जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान जुन्नर तालुक्यातील आळेफाटा जुन्नर तसेच इतर ठिकाणच्या जैन बांधवांनी या घटनेच्या निषेधार्थ काही काळ आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवले होते. या निंदनीय घटनेचे निषेधपत्र तथा निवेदन नारायणगावचे नवनियुक्त सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी स्वीकारले.

Previous articleलायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या अध्यक्षपदी ला.योगेश रायकर
Next articleकारखाना सुरू करून बिडी कामगारांना रोजगार द्यावा : भारतीय मजदूर संघाची निर्दशने