कारखाना सुरू करून बिडी कामगारांना रोजगार द्यावा : भारतीय मजदूर संघाची निर्दशने

कुरकुंभ , सुरेश बागल

पुणे मधील ठाकुर सावदेकर आणि कंपनी गेल्या १०० वर्षा पासून बिडी बनवण्याचे काम चालते, या ठिकाणी महिला कामगार कार्यरत आहेत. हा कारखाना दि. २५ जुलै २०२३ पासून कोणतेही नोटीस न देता बेकायदेशीर पणे बंद करून कामगारांना बेरोजगार झाले आहेत, या कामगारांना त्वरित काम देवून रोजगार त्वरित सुरू करावा अन्यथा मालकाच्या घरी उपोषण करावे लागेल असा ईशारा भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी भवानी पेठ कारखान्या समोर झालेल्या निदर्शने च्या वेळी दिलेला आहे दिलेला आहे.

या वेळी महाराष्ट्र राज्य बीडी कामगार संघांचे सरचिटणीस उमेश विस्वाद, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे उपस्थित होते.

सदरील कंपनीची नाना पेठ शाखा २५ जुलै रोजी बेकायदेशीर पणे कोणतेही नोटीस न देता बंद केली आहे. बीडी कामगारांच्या समोर उपासमारी चे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे त्वरित कारखाना सुरू करून बिडी कामगारांना रोजगार द्यावा या मागणीसाठी निदर्शने चालू झाली आहे.
या बाबतीत भारतीय मजदूर संघाने मा कामगार उपायुक्त पुणे यांच्या कडे तक्रारी दाखल केल्या आहेत, या बाबतीत दि २६ /०७/२०२३ रोजी सहाय्यक एन ए वाळके कामगार आयुक्त यांनी त्रिपक्षीय बैठक घेवून कामगारांची भुमिका समजून घेवून कारखाना सुरू ठेवण्यासाठी सुचना दिल्या होत्या.
पण याचे पालन ही व्यवस्थापनाने केले नाही.

सदरील कंपनीने भविष्य निर्वाह निधी चे अंशदान रक्कम जमा केली नाही त्यामुळे कार्यालयाने १७ लाख रू. त्वरित जमा करण्या चे दिले आदेश देण्यात आले आहेत.याच्या आकसामुळेच कारखाना बंद करून कामगारांवर दबाव आणण्यासाठीच व्यवस्थापनाने केला आहे पण संघटना व कामगार कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही असे मनोगत महाराष्ट्र राज्य बीडी कामगार संघांचे महामंत्री उमेश विस्वाद यांनी निदर्शनाच्या वेळी सांगितले आहे.

या वेळी भारतीय मजदूर संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री सचिन मेंगाळे, बीडी महासंघाचे उमेश विस्वाद, पार्वती अंकम, विजया झंपाल, वासंती तुम्मा, वैशाली शिरापुरी, सुशीला उरडी, संजना भुस्सा यांनी नेतृत्व केले .

Previous articleजैन साधू कामकुमारनंद यांच्या हत्येच्या निषेधार्थ नारायणगावात मूक मोर्चा
Next articleकुरकुंभ हद्दीत अपघातात दोन सख्या भावांपैकी एक जण ठार