कुरकुंभ हद्दीत अपघातात दोन सख्या भावांपैकी एक जण ठार

कुरकुंभ: सुरेश बागल

पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ हद्दीत भीषण अपघातात पिकपमधील दोन सख्ख्या भावांपैकी एक जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला आहे.

ही घटना गुरुवारी दिनांक २७ रात्री १:०० च्या सुमारास घडली. राधेश्याम देवराव वानखडे ( वय २५ ) असे मृत्युमुखी झालेल्याचे नाव आहे. तर अशोक देवराव वानखडे ( वय ३५ ) मूळ रा. मलकापूर, ता.पूर्णा, जि. परभणी सध्या रा.लोणी काळभोर, ता.हवेली हे किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधेश्याम व अशोक हे दोघे पिकअप (एमएच १२ युएम ०३०४) ने लोणी काळभोर येथून गूळ घेऊन बार्शीकडे जाण्यासाठी निघाले होते. कुरकुंभ हद्दीत पिकअपचा अपघात होऊन वाहन उलटले. पिकप चे मागील चाक तुटले. दोघे भाऊ त्यात अडकले. तेथून जाणाऱ्या दुसऱ्या वाहनाला दोरी बांधून हा पिकअप उभा करण्यात आला. पोलीस व नागरिकांनी त्यांना पिकअप मधून बाहेर काढले. राधेश्याम वानखडेला मोठ्या प्रमाणात मार लागला होता. अशोक वानखडे यांना किरकोळ दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना दौंड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र राधेश्याम हे मयत झाले.
घटनेची माहिती मिळताच कुरकुंभ पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी एस. एम. शिंदे, संजय नगरे, संभाजी साळुंखे यांनी घटनास्थळी यांनी धाव घेतली.

Previous articleकारखाना सुरू करून बिडी कामगारांना रोजगार द्यावा : भारतीय मजदूर संघाची निर्दशने
Next articleपाटस ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संचाचे वाटप