पाटस ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संचाचे वाटप

योगेश राऊत,पाटस

दौंड तालुक्यातील पाटस येथील पाटस ग्रामविकास फाउंडेशन च्या माध्यमातून शैक्षणिक अभियाना अंतर्गत अकरावी व बारावीच्या उच्च माध्यमिक विद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही विद्याशाखांमध्ये शिकणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संचांचे वाटप करण्यात येत आहे,
पुणे,दौंड ,भिगवन ,पाटस, वरवंड ,केडगाव, यवत ,कुसेगाव ,पडवी, कानगाव ,देऊळगाव गाडा येथील विविध उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या सुमारे 44 अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत वाटप करण्यात आले,

यामध्ये 39 विद्यार्थिनींचा समावेश आहे ,दहावीनंतरच्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक टप्प्यात कोणताही विद्यार्थी व विद्यार्थिनी पाठ्यपुस्तका पासून वंचित राहू नये तसेच त्यांनी आपल्या उज्वल भवितव्याकडे वाटचाल करीत इंजिनीयर ,डॉक्टर ,सी ए वकील अशा वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करावी हीच भावना ठेवत शैक्षणिक सबलीकरणासाठी पाटस ग्रामविकास फाउंडेशनने हे नाविन्यपूर्ण अभियान राबवले आहे, परिसरातून या अभियानाचे कौतुक होत आहे.

गेली सात वर्षे शैक्षणिक अभियाना अंतर्गत दरवर्षी सुमारे तीन ते चार हजार वह्यांचे विविध शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना फाउंडेशन वाटप करीत असते,*ज्याप्रमाणे अन्नदान पुण्यकर्म मानले जाते त्याच प्रमाणे शिक्षणाच्या प्रवाहात असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके दान करणे तितकेच पुण्याचे आहे असे पाटस ग्रामविकास फाउंडेशन चे पदाधिकारी विनोद कुरुमकर,हर्षद बंदीष्टी,प्रमोद ढमाले,गौतम पानसरे,राज मुलाणी,नवनाथ सोनवणे,रवींद्र शाळू,सार्थक मोरे यांच्याकडून सांगण्यात आले.

Previous articleकुरकुंभ हद्दीत अपघातात दोन सख्या भावांपैकी एक जण ठार
Next articleबेकायदेशीर गावठी दारू विकणाऱ्याची १ वर्षासाठी नागपूर कारागृहात रवानगी