बेकायदेशीर गावठी दारू विकणाऱ्याची १ वर्षासाठी नागपूर कारागृहात रवानगी

गणेश सातव,वाघोली

लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारुचे अड्डे पुर्णपणे उध्दवस्त करुन गावठी हातभट्टी दारुच्या भट्टया पुर्णपणे नाहीशा करुन गावठी दारूची निर्मिती विक्री व वाहतुक या सर्वांवर पायबंद घालण्यासाठी लोणीकंद पोलीसांनी मागील काही दिवसांपासून कारवाई सुरु केली आहे. यामध्ये भावडी गाव येथील बेकायदेशीर दारु भट्टीवर छापा टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान २ इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची प्रत्येकी ३ दिवसांची पोलीस कोठडी घेतली होती.यापुढेही लोणीकंद पोलीसांच्यावतीने अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान केवळ छापे टाकत न बसता अशा प्रकारे बेकायदेशिर गावठी हातभट्टीची निर्मिती विक्री व वाहतुक करणाऱ्या इसमांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ति व दृकश्राव्य कलाकृतींची विना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ति (व्हिडीओ पायरेटस) यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबतचा अधिनियम (एम.पी. डी.ए.) या कायद्यान्वये कारवाई करुन सदर इसमांवर अंकुश ठेवण्यात येईल.

लोणीकंद पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील बेकायदेशीर गावठी दारु विकणारा आरोपी गुरुनाथ ऊर्फ महेश जालिंदर कांबळे,वय- ३२ वर्षे(रा. एस.टी. कॉलनी वाघोली ता. हवेली जि. पुणे) याचेवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ति व दृकश्राव्य कलाकृतीची विना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ति (व्हिडीओ पायरेटस) यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबतचा अधिनियम (एम. पी.डी.ए.) अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता.पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनकडील प्रस्ताव मान्य करुन एम.पी.डी.ए. कायद्यान्वये आरोपी गुरुनाथ ऊर्फ महेश जालिंदर कांबळे यास एक वर्षासाठी नागपुर मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे स्थानबध्द करण्याचे आदेश काढले असुन सदर इसमास दि.२६ जुलै रोजी नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे १ वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे.

यापुढेही हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणाऱ्या तसेच वाहतुक करणाऱ्या इसमांवर यापुढेही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचे लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी सांगितले आहे.

सदर स्थानबध्दतेचा प्रस्ताव सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा,पोलीस उपआयुक्त शशिकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त संजय पाटील,पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे)सिमा ढाकणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी अत्यंत परिश्रम पुर्वक तयार केला आहे.

आपल्या परिसरात,गावात हातभट्टी दारुची निर्मिती, विक्री व वाहतुक होत असल्यास नागरिकांनी न घाबरता लोणीकंद पोलीस स्टेशन, संपर्क क्रमांक ९५२७०६९१०० यावर कळविण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी केले आहे.

Previous articleपाटस ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संचाचे वाटप
Next articleवाघोली येथील बी जे एस शैक्षणिक प्रकल्पात ‘मी विजेता होणारचं!’ या प्रेरणादायी प्रयोगाचे सादरीकरण