वाघोली येथील बी जे एस शैक्षणिक प्रकल्पात ‘मी विजेता होणारचं!’ या प्रेरणादायी प्रयोगाचे सादरीकरण

गणेश  सातव, वाघोली ,पुणे

भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघोली येथे मी विजेता होणारच…!या डॉ. उमेश कणकवलीकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन वाघोलीचे प्रसिद्ध उद्योजक संपत आबा गाडे यांनी केले होते. ‘मी विजेता होणारचं’ हा जिद्द आत्मविश्वास जागृत करणारा व महाराष्ट्रात गाजत असलेला प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. आम्ही तुमचे भविष्य घडवत नाही आम्ही तुम्हालाच भविष्यासाठी घडवतो या प्रेरणेने डॉ. उमेश कणकवलीकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्नांची दारे उघडण्यासाठी सकारात्मक ऊर्जा दिली.

आपल्या प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थ्याना ध्येय निश्चीती कशी करावी, सकारात्मक दृष्टिकोन कसा वाढवावा , अध्ययन करताना आपला उद्देश नेहमी समोर ठेवावा यासह अनेक बाबींची माहीती उदाहरणासह मार्मिक शब्दात सांगितली यावेळी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद दिला यानिमित्ताने वाघोली येथील प्रसिद्ध उद्योजक संपत आबा गाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना “मी श्रीमंत होणारच” या पुस्तकाचे वाटप केले.

विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द व मेहनत करून सकारात्मक दिशेने वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते असे सांगितले.या कार्यक्रमास भारतीय जैन संघटना पुनर्वसन प्रकल्प प्रमुख सुरेश बापू साळुंखे आवर्जून उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य पोपटराव गेठे, पर्यवक्षक पांडुरंग पवार,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleबेकायदेशीर गावठी दारू विकणाऱ्याची १ वर्षासाठी नागपूर कारागृहात रवानगी
Next articleभारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनानिमित्त वीज कामगार महासंघाचा रक्तदानाचा महायज्ञ