मारहाण प्रकरणी नारायणगावात हॉटेल चालकावर गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

हॉटेलमध्ये रोटी ची ऑर्डर दिल्यानंतर लवकर रोटी आणली नाही या कारणावरून हॉटेल चालकाने हॉकी स्टिक व लाथाबुक्क्यांनी जबरी मारहाण केल्याची घटना नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.

गणपीर दरबार या हॉटेलचा हॉटेल चालक मल्हारी भाऊ फापाळे (राहणार बदगी बेलापूर ता अकोले जि. नगर) याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३२६, ३२४,५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.या घटनेची फिर्याद गणेश जयवंत गाडेकर (वय ४४) राहणार वारूळवाडी यांनी दिली.

फिर्यादी व त्यांचे मित्र मंगळवार दिनांक चार रोजी रात्री जेवण करण्यासाठी गणपीर दरबार या हॉटेलमध्ये गेले होते त्यावेळी गणेश गाडेकर यांनी रोटीची ऑर्डर दिली. ती रोटी लवकर का आणली नाही असे म्हटल्यानंतर आरोपी मल्हारी फापाळे याने गाडेकर यांच्या डोक्यात, पोटात, पाठीवर, छातीवर हॉकी स्टिक ने व लाथा बुक्याने मारून त्यांना गंभीर जखमी केले.

यावेळी त्यांच्यासोबत असलेले रोहिदास पांडुरंग घोलप यांना देखील हॉकी स्टिकने पाठीमागून मारून शिवीगाळ व दमदाटी केल्याच्या कारणावरून आज दिनांक ५ रोजी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दाते हे करत आहेत.

Previous articleमारहाण व विनयभंग केल्या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
Next articleपाटस येथील नागेश्वर विद्यालयात ३० वर्षांनी भरला ‘मैत्रीचा कट्टा’: दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात