आखरवाडी केंद्रातील शिक्षकांची जी २० प्रदर्शनास भेट


राजगुरूनगर- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे G 20 अंतर्गत शैक्षणिक प्रदर्शनासbआखरवाडी(चास.ता-खेड) केंद्रातील शिक्षक,शिक्षिका यांनी नुकतीच भेट दिली.खरे तर G 20 चे अध्यक्ष पद सध्या आपल्या भारत देशाला लाभले असल्याने त्याचा एक भाग म्हणून पुण्यात विद्यापीठात सध्या हे शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले आहे.केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री राजकुमार रंजण सिंह,अनेक राज्यांचे राज्यपाल,शिक्षण मंत्री,अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत G 20 शैक्षणिक प्रदर्शन नुकतेच थाटामाटात सुरू झाले.


पुणे विद्यापीठाच्या भव्य प्रांगणात मोठ्या सभागृहात प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.देशातील जवळपास सर्व राज्यांचे शैक्षणिक स्टॉल येथे आपणास पाहण्यास मिळतात.त्या त्या राज्याची शिक्षण पद्धती,शैक्षणिक साधने,पाठ्यपुस्तके , आदी बाबी तेथील शिक्षण खात्यातील प्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी शिक्षकांनी संवाद साधला.

देशभरातील आलेल्या या शिक्षण प्रतिनीधी, अधिकारी यांची भाषा ,संस्कृती ,वेश भूषा यांचेही नकळत दर्शन शिक्षकांना झाले.
.”निपुण भारत” अमलबजावणी हा प्रदर्शन केंद्र बिंदू आहे.त्या त्या राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या दृष्टीने सध्या निपुण भारत अंतर्गत सुरू असणारे उपक्रम याबद्दल शिक्षकांनी माहिती घेतली.

या अभ्यास दौऱ्यात आखरवाडी केंद्रातील शिक्षक.संदीप जाधव,मधुकर गिलबिले,बाळासाहेब मुंढे,हेमंत कारोटे ,रवींद्र पाचारणें याशिवाय महिला शिक्षिका शालन कळमकर,जयश्री घुमटकर ,मीरा कुटे,शोभा सुतार ,शुभांगी भुजबळ,मोनिका खांडगे,रेणुका फल्ले सहभागी झाले होते.प्रदर्शन पाहून खऱ्या अर्थाने समाधान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या कामी पंचायत समिती खेड गट शिक्षण अधिकारी जीवन कोकणे साहेब,विस्तार अधिकारी ज्योती चीलेकर मॅडम,केंद्रप्रमुख कल्पना टाकळकर मॅडम यांचे मार्गदर्शन ,सहकार्य लाभले.
…………………………

Previous articleजलजीवन मिशन योजनेच्या ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर अपघात : सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेञे
Next articleदर्जेदार शिक्षणासाठी समाजाचा सहभाग गरजेचा – अमित बेनके