जलजीवन मिशन योजनेच्या ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर अपघात : सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेञे

कुरकुंभ : सुरेश बागल

दौंड तालुक्यातील सहजपूर गावातील ग्रामपंचायतीत भारत सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत शेलारवाडी तळयावरून पाईपलाईन चारीकाम  चालू आहे. जावजीबुवा मंदीर ते सहजपूर फाटा येथील पाईपलाईन काम हायवेचा साईडपटटा पासून १०-१२फुटावर करणे गरजेचे असताना ठेकेदार पाईपलाईन चारी साईट पट्ट्या पासून २-३ फुटावर जेसीबीने,लेबर लोकांनी चारी घेतली असल्याने माती साईडपटटयावर पडली आहे ७-८ दिवसापासून चारीत पाईप टाकले जात आहेत. पण ठेकेदार साईडपटटयावर पडलेली माती पाईपलाईन बुजवताना व्यवस्थित साफ न करता अर्धवट माती साईडपट्ट्यावर पडलेली तशीच आहे .त्यामुळे चारी उकरलेल्या रस्त्यावर रोजच फोर व्हीलर, टु व्हीलर अपघात होऊन लोक जायबंदी,फॅकचर,जीव जाणे असे प्रकार होत आहेत.

तरीही सार्वजनिक बांधकाम खात्यातील प्रशासनाला, सहजपूर ग्रामपंचायतीला नम्रतेची विनंती आहे की उद्या सकाळी चारी उकरलेल्या लोकांकडून २ ते ३ किलोमीटर अंतरावरील साईडपटटयावरील माती पुर्णपणे साफ करून घ्यावी मघाशीच ५: ०० वाजता सहजपूर फाट्यावर या मातीमुळे निरवडे या व्यक्तीचा अपघात होऊन गुडघ्याची वाटीचा चुराडा होऊन निरवडे यांना कायमचे अपंगत्व आले आहेत. तरीही प्रशासन, सहजपूर ग्रामपंचायतीने लक्ष घालून माती हटवावी नाहीतरी कोणाचातरी जीव गेल्यावर ग्रामपंचायतीला जाग येणार का असा प्रश्न सामान्य लोकांना पडला आहे. अशा बेजबाबदार वागणाऱ्या ठेकेदारावर प्रशासन कारवाई करील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Previous articleतन,मन,आत्मा आणि बुद्धी यासाठी योगसाधना करा योगाचार्य शेखर गाडे यांचे आव्हान
Next articleआखरवाडी केंद्रातील शिक्षकांची जी २० प्रदर्शनास भेट