तन,मन,आत्मा आणि बुद्धी यासाठी योगसाधना करा योगाचार्य शेखर गाडे यांचे आव्हान

घोडेगाव – मोसीन काठेवाडी

राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे १२५ विद्यार्थी व माध्यमिक शाळेचे २७५ विद्यार्थ्यांनी योग दिनात सहभाग घेतला.विद्यार्थ्यांन समवेत प्राथमिक शाळेतील व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.आरोग्य संपन्न जीवनासाठी योग प्रशिक्षक शेखर गाडे यांनी मुलांना सूक्ष्म व्यायाम,आसनांचे विविध प्रकार,प्राणायाम आणि ध्यान-धारणा यांची प्रात्यक्षिके दाखवून मुलांकडून त्यांचा सराव करून घेतला.

विद्यार्थ्यांनी तन-मन,आत्मा आणि बुद्धी यासाठी आपण दररोज त्याचा सराव करावा त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सकस आहार,राजस आहार व तामस आहार याबाबत मार्गदर्शन करताना शाकाहारी जीवनशैली स्वीकारण्याचे त्यांनी आवाहन केले.योग दिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक अविनाश ठाकूर व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला कोकणे यांनी शेखर गाडे यांचा सत्कार केला.

योगदिन यशस्वी करण्यासाठी माणिक हुले, वैशाली काळे,सजंय वळसे,वंदना मंडलिक,लक्ष्मी वाघ,वैभव गायकवाड,गौरी वेसावे,निलम लोहकरे, संतोष पिंगळे,सुभाष साबळे,गुलाब बांगर,लक्ष्मण फलके,मिनाक्षी रायबोले,जयश्री मिडगे,गणपत डोके,पुनम डोके यांनी नियोजन केले.

Previous articleन्यु इंग्लिश मेडियम स्कूल,शासकीय आश्रमशाळा,आसाणे तसेच विविध ठिकाणी योग दिन साजरा
Next articleजलजीवन मिशन योजनेच्या ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर अपघात : सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेञे