न्यु इंग्लिश मेडियम स्कूल,शासकीय आश्रमशाळा,आसाणे तसेच विविध ठिकाणी योग दिन साजरा

घोडेगाव – मोसीन काठेवाडी
नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त,NIN, आदिवासी युनिटने आंबेगाव तालुक्यातील विविध ठिकाणी,इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळा,घोडेगावसह आदिवासी युवकांच्या आरोग्य आणि मानसिक पैलूंवरील योगाचे फायदे सांगणारे योगाचे सत्र आयोजित केले.

शासकीय आश्रमशाळा,आसाणे,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ज्यामध्ये आहुपे,राजपूर,गोहे बीके,तेरुंगण येथील आदिवासी निवासी शाळा सहभागी झाल्या होत्या.प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगून प्राणायाम आणि आसनाचा दररोज सराव करण्याचे फायदे त्यांना तंदुरुस्त आणि मजबूत ठेवण्यास मदत करतात असे सांगितले.

असाच उपक्रम डोंगरमाथ्यावरील खेडेगावात,आसाणे या आदिवासी निवासी शाळेत आयोजित करण्यात आला होता,जिथे दुर्गम भागातील आदिवासी तरुणांनी योगाच्या उत्सवात सहभाग घेतला होता.NIN आदिवासी युनिट देखील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव येथे योग साजरा करत आहे.जिथे १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सामाईक योग प्रोटोकॉलमध्ये उत्साहाने भाग घेतला.योग या शब्दाचे कलेच्या रूपात प्रतिनिधित्व विद्यार्थ्यांनी युग म्हणजे संघटन या अर्थाचे अधिक प्रभावीपणे चित्रण केले. हा संपूर्ण कार्यक्रम डॉ.के सत्यलक्ष्मी,संचालिका बापू भवन आणि त्यांच्या टीमच्या NIN आदिवासी युनिटच्या देखरेखीखाली पार पडला.

Previous articleघोडेगाव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योगदिन साजरा
Next articleतन,मन,आत्मा आणि बुद्धी यासाठी योगसाधना करा योगाचार्य शेखर गाडे यांचे आव्हान