घोडेगाव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योगदिन साजरा

घोडेगाव -मोसीन काठेवाडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे संचालक भानुदास काळे,आंबेगाव भाजपा तालुका उपाध्यक्ष विजय काळे,शहर उपाध्यक्ष निलेश काळे,घोडेगाव बीटचे विस्तार अधिकारी राजु जोशी,विस्तार अधिकारी पंढरीनाथ भागित,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत काळे, मुख्याध्यापक अलका चासकर,सुनिता काठे, ललिता शेळके,नंदा काठे,राजाराम काथेर तसेच १४२ विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी भानुदास काळे यांनी सर्व विद्यार्थ्याचे पुरक व्यायाम,उभी योगासने,बैठी योगासने,पोटावरची योगासने व पाठीवरची योगासने प्रात्यक्षिक दाखवुन करून घेतली. योगाचे जीवनातील महत्व याविषयी माहिती दिली. निलेश काळे यांनी सुर्य नमस्कार घेतले. यावेळी शाळेच्या वतीने सर्व मान्यवराचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत काळे यांनी सर्वाचे आभार मानले.

Previous articleहडपसर ते पंढरपूर या महामार्गावर वृक्षतोडी झाल्यामुळे पुणे जिल्हा पर्यावरण विभाग काँग्रेस कमिटी यांच्याकडून उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन
Next articleन्यु इंग्लिश मेडियम स्कूल,शासकीय आश्रमशाळा,आसाणे तसेच विविध ठिकाणी योग दिन साजरा