हडपसर ते पंढरपूर या महामार्गावर वृक्षतोडी झाल्यामुळे पुणे जिल्हा पर्यावरण विभाग काँग्रेस कमिटी यांच्याकडून उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन

कुरकुंभ : प्रतिनिधी, सुरेश बागल

हडपसर ते पंढरपूर या पालखी महामार्गावर वृक्षतोडी झाल्यामुळे ,झाडे लावण्यात यावी यासाठी सोमवार दिनांक १९.०६.२०२३ पुणे जिल्हा पर्यावरण विभाग काँग्रेस कमिटी यांच्याकडून पुणे निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले. हडपसर ते पंढरपूर या पालखी महामार्गावर पुरातन काळापासून असलेली वड ,पिंपळाची मोठी असलेली झाडे गेल्या दोन वर्षात तोडून टाकल्याने या मार्गाचे आता महामार्गात रूपांतर झाले आहे. मात्र वृक्षतोडीमुळे निसर्गाचे नैसर्गिक सौंदर्य हरपून गेले आहे. पालखी महामार्ग झाडे नसल्यामुळे बोडका झालेला आहे. त्यामुळे गावाचे गावपण लयाला गेल्याचे चित्र सर्व ठिकाणी दिसून येत आहे.

अनेक ठिकाणी गावाच्या नावाचे फलक रस्त्यावरील अपघाताचे जागा दाखवणारे सूचना फलक गायब झालेले आहेत. मूळ रस्ता १५० ते २५० झाला असला तरी त्यावर पक्के बांधिव दुभाजक नसल्याने अचानक कोठेही नियम मोडून वळणाऱ्या वाहनांमुळे धोका निर्माण होत आहे. वास्तविक दिवेघाट चढून माथ्यावर आल्यानंतर सासवड -जेजुरी , वाल्हे – निरे ,लोणंद – फलटण पर्यंत रस्त्याच्या तू तर असलेले मोठे मोठे वृक्ष पिढ्यान पिढ्या पादचाऱ्यांना निवारा व सावली देत उभे होते. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यामुळे हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित होणार आहे. पण मोठ्या प्रमाणावर तोडल्या गेलेल्या झाडांच्या जागी दुसरी झाडे लावण्याचे पुनर लागवड न केल्यामुळे हा रस्ता उजाड पडलेला आहे.

खालील मुद्दे निवेदनामध्ये उपस्थित करून दिलेले आहेत

१) हडपसर ते पंढरपूर पालखी महामार्गावर कामे चालू असताना कॉन्ट्रॅक्टर मार्फत वृक्षतोड झालेली आहे. त्या ठिकाणी नवीन दुसरी झाडे कॉन्टॅक्टरने लावलेली नाहीत. त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही कॉन्ट्रॅक्ट दारावर अद्यापर्यंत झालेली नाही.

२) हडपसर ते पंढरपूर पालखी महामार्गावर कामे चालू असताना कॉन्ट्रॅक्टर मार्फत वृक्षतोड केलेली आहे. त्या ठिकाणी नवीन वृक्ष लावण्यात आलेले नाहीत.

३) हडपसर ते पंढरपूर महामार्ग संदर्भात सर्वपक्षीय समिती गठीत करून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे. हडपसर ते पंढरपूर या पालखी महामार्गावर वृक्षतोडी झाल्यामुळे ,झाडे लावण्यात यावी यासाठी सोमवार दिनांक १९.०६.२०२३ पुणे जिल्हा पर्यावरण विभाग काँग्रेस कमिटी यांच्याकडून पुणे निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष पर्यावरण विभाग तन्मय पवार, पर्यावरण विभाग प्रदेश सचिव प्रमोदजी पंडित,  प्रदेश सरचिटणीस अमरजी नाणेकर ,पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस पृथ्वीराज दादा पाटील उपस्थित होते.

Previous articleवडजाई येथील जिल्हा परिषद शाळेत ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा
Next articleघोडेगाव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योगदिन साजरा