वडजाई येथील जिल्हा परिषद शाळेत ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा

गणेश सातव,वाघोली

९ वा जागतिक योगदिन वडजाई(आव्हाळवाडी,ता-हवेली) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात संपन्न झाला.शाळेतील शिक्षक गणेशानंद दराडे यांनी योग व प्राणायामाची विविध प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांकडून योग कृती करून घेतली. योग पूर्वतयारी,विविध योगासने वज्रासन,बद्ध पद्मासन,मकरासन, भुजंगासन, पर्वतासन,ताडासन, मयुरासन,पवनमुक्तासन,शवासन इ.त्याचप्रमाणे अनुलोम विलोम,भसरीका,भ्रमरि इ.प्राणायाम प्रकार विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने केली.

मुलांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून येत होता.यानंतर पुढेही प्रत्येक शनिवारी व्यायाम,कवायतीबरोबरचं योग व प्राणायाम सुद्धा करायचे अशी उस्फुर्त भावना विद्यार्थ्यांनी बोलावून दाखवली.मुख्याध्यापक शंकर बडे यांनी जागतिक योग दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन, दैनंदिन जीवनात योग कसा महत्त्वाचा आहे, योगामुळे आपल्या शरिर व मनाच्या शक्तीला किती फायदा होऊ शकतो याची सविस्तर माहिती दिली.

Previous articleजगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने भक्तिमय वातावरणात पार केला रोटी घाट
Next articleहडपसर ते पंढरपूर या महामार्गावर वृक्षतोडी झाल्यामुळे पुणे जिल्हा पर्यावरण विभाग काँग्रेस कमिटी यांच्याकडून उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन