पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद

नारायणगाव :- (किरण वाजगे)

उत्तर पुणे जिल्ह्यासह जुन्नर तालुका हे बिबट्याचे माहेरघर म्हणून आता सर्वश्रुत आहे. तालुक्यातील सर्वच भागात बिबट्याचे दर्शन हे नित्याचे झालेले आहे.नारायणगाव जवळील मांजरवाडी येथे मंगळवार दिनांक १२ रोजी रात्री वन विभागाने भगवान टेके यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बुधवारी पहाटे ४ वाजता बिबट्या जेरबंद झाला. चारच दिवसांपूर्वी येथे बिबट्याने एक शेळी फस्त केली होती.गेली दोन महिन्यात मांजरवाडी परिसरात पकडण्यात आलेला हा चौथा बिबट्या आहे.

दरम्यान वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले, वनरक्षक पवार, वन कर्मचारी खंडू भुजबळ यांनी पिंजरा लावला होता.

नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस कर्मचारी दत्ता ढेंबरे, पोलीस पाटील सचिन टाव्हरे, ग्राम सुरक्षा दलाचे जवान राम चोपडा, तुषार टेके, नितीन चौधरी, वारूळवाडी चे पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांच्या विशेष परिश्रमामुळे हा बिबट्या जेरबंद करण्यात आला.
या परिसरात बिबट्याचा वावर व पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी केली आहे

Previous articleछत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा जुन्नरमध्ये उभारणार
Next articleराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न