राम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

घोडेगाव – मोसीन काठेवाडी

घोडेगाव (ता.आंबेगाव ) येथील अग्रगण्य असलेले राम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा १२/०९/२०२३ रोजी संस्थेचे अध्यक्ष अक्षय रामशेठ काळे यांच्या अध्यक्षतेखाली अमित पॅलेस,घोडेगाव या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेला २६ लक्ष नफा झालेला असून संस्थेच्या १४ कोटी ५१ लक्ष ठेवी,१२ कोटी ७४ लक्ष कर्ज वाटप असुन खेळते भाग भांडवल १९ कोटी १० लक्ष आहे. तसेच ११ टक्के लाभांश दिला आहे.

संस्थेस २०२२-२०२३ सालात ऑडीट वर्ग अ मिळाला असल्याची माहीती संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.शनि कर्पे यांनी दिली. सदर सभे प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अक्षय काळे, उपाध्यक्ष विजय मेहेर, संचालक दत्तात्रय काळे, विनोद काळे,संजय शिंदे, अजित काळे,विनोद गुप्ता, महेश बो-हाडे,निलेश मिडगे, प्रमोद गांधी,विलास शेटे, घोडेगांवचे सरपंच अश्विनी तिटकारे,उपसरपंच सोमनाथ काळे,शरद बँकेचे संचालक सुदाम काळे,तज्ञ संचालक संजय आर्विकर, आं.ता.वि.वि.मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे,संचालक जयसिंग काका काळे,आं.ता. देखरेख संघाचे अध्यक्ष सखाराम काळे,शामशेठ होनराव,पुरुषोत्तम भास्कर, किरणशेठ घोडेकर,मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक रत्नाताई गाडे, सचिन भाऊ भोर, विजय काळे सर, तानाजीशेठ जंबुकर, गिरवलीचे उपसरपंच संतोष सैद,नवनाथशेठ हुले, बी.डी. काळे महाविदयालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर वाल्हेकर, ज्योतीताई घोडेकर,हिरामण ढोरे हे मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष अक्षय काळे यांनी संस्थेच्या विविध योजना व धोरणयावर आपले मत व्यक्त केले व पुढील काळात देखील सभासद विश्वास ठेऊन संस्थेस सहकार्य करतील अशी आशा व्यक्त केली.सदर कार्याकमाचे प्रस्ताविक सुप्रसिद्ध निवेदक सतिश जाधव यांनी केले.संस्थेचे अध्यक्ष अक्षय काळे यांनी संस्थेच्या विविध योजना व धोरण यावर आपले मत व्यक्त केले

Previous articleपाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद
Next articleमहाळुंगे पडवळ येथे पारंपरिक बैलपोळा सण उत्साहात साजरा