महाळुंगे पडवळ येथे पारंपरिक बैलपोळा सण उत्साहात साजरा

किरण वाजगे

महाळुंगे पडवळ हुतात्मा बाबू गेनू व आंबेगाव तालुक्याचे माजी आमदार अण्णासाहेब आवटे यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या व उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बैलपोळा सण साजरा होणाऱ्या महाळुंगे पडवळ या गावात भव्य बैलपोळा सोहळा व यात्रा सलग तीन दिवस उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
यानिमित्ताने महाळुंगे येथे डीजे व बँजोच्या तालावर आकर्षक पद्धतीने सजविलेल्या बैलांच्या मिरवणुकीसह कुस्त्यांच्या आखाड्याची किर्ती भारत भर प्रसिद्ध आहे. या यात्रेत संत तुकाराम महाराज पालखीची हभप रोहन महाराज मोरे यांची बैलजोडी विशेष आकर्षण ठरली. बैलगाडा शर्यत सुरू असल्याने यंदा बैलांची संख्या मोठी होती.आजच्या या बैलपोळा सोहळ्यात दत्तात्रय बबनराव चासकर यांच्या बैलाला प्रथम पूजेचा मान मिळाला ग्रामदैवत दत्त मंदिरावरील नदीस पोलीस पाटील सविता पडवळ व सरपंच सुजाता चासकर यांच्या हस्ते बाशिंग बांधून पूजन करण्यात आले.

या सोहळ्यास यात्रा समितीचे अध्यक्ष सुभाष पडवळ, अरुण चासकर, केके सैद, दीपक चासकर, माणिक सैद, प्रशांत सैद, विकास पडवळ, दत्तात्रय आवटे, अजय आवटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुकाप्रमुख सुरेखा निघोट, डॉ दत्ता चासकर, बाबाजी चासकर, सचिन चासकर, प्रसिद्ध बैलगाडा मालक राजुशेठ आवटे, अक्षय सोलाट, नितीन पडवळ, युवा सेना ऊपतालुकाप्रमुख राहुल पडवळ, प्रदिप पडवळ, आकाश पडवळ, पिंटुशेठ पडवळ , किशोर चासकर, महाराष्ट्र व मुंबई पोलीस अधिकारी बापू चासकर, अजित चासकर, किरण वाजगे, विकास सुपेकर, महेश वालझाडे, संदीप वायाळ, राजेंद्र दहीतुले तसेच गावातील अबाल व्रुद्ध महिला
शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील शेतकऱ्यांनी वर्षभर काळया मातीची सेवा करणाऱ्या आपल्या सर्जाराजांना येथील मुख्य चौकात मिरवणुकीत आणले होते.

हजारो ग्रामस्थ पाहुणे मंडळीनी, विविध दुकानदारांनी या यात्रेत सहभागी होऊन ग्रामीण अर्थचक्रास लाखो रुपयांच्या ऊलाढालीतुन चालना दिली.
एवढया मोठया प्रमाणात शेकडो वर्षे बैलपोळा सण साजरे करणारे पुणे जिल्ह्यातील एकमेव गाव म्हणजे म्हाळुंगे पडवळ होय.दरम्यान यात्रेकरूंना मनोरंजनासाठी तमाशा व लावणी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

Previous articleराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
Next articleविक्रांत पतसंस्थेची अल्पावधीत गरुड झेप – संतोषनाना खैरे