शरदचंद्रजी पवार भोजन थाळीचा जुन्नर बाजार समितीचा उपक्रम उल्लेखनीय – अजित पवार

नारायणगाव ,किरण वाजगे

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांच्या वतीने बाजार समितीच्या आवारात येणाऱ्या शेतकरी व्यापारी कामगार यांच्यासाठी नारायणगाव उपबाजार केंद्रामध्ये सुरु केलेला “शरदचंद्रजी पवार भोजन थाळी” चा उपक्रम उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजार समितीचे सभापती संजय काळे व संचालक मंडळाचे यावेळी अभिनंदन केले.जुन्नर बाजार समितीने नारायणगाव उपबाजारात सुरू केलेल्या शरदचंद्रजी पवार भोजन थाळी चा शुभारंभ शुक्रवार (दि.२२ ) रोजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी आमदार अतुल बेनके, उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक धनेश संचेती, निवृत्ती काळे, प्रकाश ताजने, संतोष घोटणे, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार,, शरद लेंडे, मोहित ढमाले, ज्येष्ठ बागायतदार गुलाबराव नेहरकर, विनायक तांबे, तुळशीराम शिंदे, बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे, सहसचिव शरद धोंगडे तसेच व्यापारी, शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तयार केलेल्या थाळीची उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. किती भाज्या देणार, भोजन थाळी ची किंमत काय आहे, कोणता तांदूळ वापरता या गोष्टीची माहिती सभापती काळे यांच्याकडून पवार यांनी जाणून घेतली.

Previous articleवाघोलीतील “शासन आपल्या दारी” कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
Next articleवाघोलीतील “शासन आपल्या दारी” कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद