सर्वांगीण विकास हा बालकांचा नैसर्गिक हक्क – सरपंच योगेश पाटे

नारायणगाव ,किरण वाजगे

विशेष गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर मुलांना कला, क्रीडा, मनोरंजन यांची संधी देऊन त्यांच्या विकासाचा विचार करायला हवा, सर्वांगीण विकास हा बालकांचा नैसर्गिक हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी शाळा, शासन आणि समाज यांनी संयुक्त प्रयत्न केले पाहिजेत असे मनोगत नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी व्यक्त केले.

पंचायत राज दिनानिमित्त जि.प.प्राथमिक शाळा नारायणगाव नं.१ येथे ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या वतीने आयोजित केलेल्या बालसभेचे अध्यक्ष म्हणून सरपंच योगेश पाटे बोलत होते.

याप्रसंगी माजी उपसरपंच संतोष दांगट, रोटरी क्लबचे हॅप्पी स्कूल प्रकल्पाचे समन्वयक रो.सचिन घोडेकर, रो.तेजस वाजगे, रो.प्रशांत ब्रम्हे, मेहबूब काझी, ग्रामपंचायात सदस्या रुपाली जाधव,. पुष्पाताई आहेर, मुख्याध्यापक निवृत्ती कामठकर,आशा झोडगे, अकील नळगिरकर, आझम शेख, राजेश रत्नपारखी, मच्छिंद्र जगताप, प्रतिक पोखरकर,अझर शेख, शिक्षक, विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

नारायणगाव परिसरातील सर्व शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी ग्रामपंचायत नारायणगाव आवश्यक प्रयत्न करीत आहे, भविष्यकाळात क्रीडा साधनं, व्यायामशाळा, सांस्कृतिक महोत्सवासोबत क्रीडा महोत्सव सुरू करणार असल्याचे सरपंच पाटे यांनी सांगितले.

या सभेत बाल हक्क आयोगाअंतर्गत बालकांचे हक्क आणि त्यांची अंमलबजावणी या विषयी मेहबूब काझी यांनी तसेच बालकांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांबद्दल भाग्यश्री बेलवटे यांनी माहिती सांगितली. यावेळी मुख्याध्यापक निवृत्ती कामठकर, आशा झोडगे, आझम शेख, विद्यार्थी सार्थक ओव्हाळ, पूर्वी लाडके, मोहम्मद अन्सारी यांचीही भाषणे झाली.

यावेळी रोटरी क्लब नारायणगाव यांच्यावतीने ‘हॅप्पी स्कूल ‘ या प्रकल्पाअंतर्गत नारायणगांव येथील जिल्हा परिषद मुलींची प्राथमिक शाळेची निवड करण्यात आली असून याद्वारे शाळेत भौतिक सुविधांबरोबरच ‘रोटरी संगणक कक्ष’ विक्रांत पतसंस्थेच्या वतीने ‘ विक्रांत शुद्ध पेयजल योजना’ कार्यान्वित करीत असल्याची घोषणा प्रकल्प समन्वयक रो.सचिन घोडेकर यांनी केली. सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक निवृत्ती कामठकर यांनी केले, सूत्रसंचालन भाग्यश्री बेलवटे यांनी केले व आभार मच्छिंद्र जगताप यांनी मानले.

Previous articleवाघोलीत बेवारस तरुणाला मिळाला ‘माहेर’ संस्थेच्या ‘करुणालया’चा ‘आधार’
Next articleरामोजी फिल्म सिटीमध्ये हॉलिडे कार्निवल मध्ये ग्रुप डान्समध्ये शिरुर परीसरातील ग्रामिण महिलांना पारितोषिक