रामोजी फिल्म सिटीमध्ये हॉलिडे कार्निवल मध्ये ग्रुप डान्समध्ये शिरुर परीसरातील ग्रामिण महिलांना पारितोषिक

कवठे येमाई (प्रतिनीधी धनंजय साळवे) – ग्रामीण भागातील महिलांना घर आणि मूल याच्या बाहेर पडता यावं या हेतूने महिलांची हैद्राबादला विमानाने सहल नेण्यात आली. रामोजी फिल्म सिटीच्या भटकंतीमध्ये ट्रिपच्या दरम्यान रामोजी फिल्म सिटीमध्ये हॉलिडे कार्निवल मध्ये ग्रुप डान्समध्ये शिरुर परीसरातील ग्रामिण महिलांनी सहभाग घेतला आणि पारितोषिक पण मिळवले.

ग्रामीण भागातील महिलांना संधी मिळाली तर त्या जिद्दीने सर्व काही करू शकतात हा विश्वास महिलांमध्ये रुजताना दिसतोय.

आज ग्रामिण भागातील महिला आत्मविश्वसाने पुढे जाताना दिसत आहे आपल्या कुटुंबाची जबाबदारी प्राधानान्ये देत तर आहेच पण त्याचबरोबर स्वतःतील स्वत्व ओळखुन आपल्या आवडी निवडीलाही वाव देताना दिसत आहे.

सामाजिक कार्यकर्त्या सौ.वैशालीताई रत्नपारखी व त्यांचा गृप हे सतत ग्रामिण भागातील महिलांना स्वताच्या पायावर उभे रहाण्यासाठी व्यावसाईक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत असतात. त्याचबरोबर महीलांना पर्यटनाची संधी मिळावी म्हणुन राज्यात, परराज्यात , विमान,रेल्वे,आरामबस ने पर्यटनासाठी प्रवासाची संधी देत असतात.

ह्या सहलीमध्ये जिजाताई दुर्गै मा.सरपच निमोणे,साधना पोकळे ग्रा.पं.सदस्या कवठे, नंदा घोडे,साधना शेलार, सुषमा पठारे,कविता राक्षे,वसुंधरा पांचगे,संगिता शिन्दे,सारीका पोकळे,ज्योती पाटील,

माधुरी निगडे,प्रतिक्षा मेंगवडे ,राजश्री काळे,जया खांडरे,जया तरडे,रेखा महाजन,शुभांगी पवार ई.महिला भगिनींनी सहभाग घेतला.

Previous articleसर्वांगीण विकास हा बालकांचा नैसर्गिक हक्क – सरपंच योगेश पाटे
Next articleवंचितांच्या शिक्षणासाठी टच अ लाइफचे कार्य मोलाचे – शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे