Home Blog Page 124

वाघोलीतील “शासन आपल्या दारी” कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

गणेश सातव,वाघोली

सर्वसामान्य नागरिक व असंघटित दगड कामगारांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शुक्रवारी (दि.२२) वाघोली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. वाघोलीतील सोयरिक गार्डन मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाचा तब्बल ४३०० नागरिकांना लाभ झाला असल्याची माहिती शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली.

वाघोलीतील नागरिकांचे विविध प्रश्न एकाच ठिकाणी मार्गी लागावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अँड अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार ,हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार तृप्ती कोलते,गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के,अँड बी.एम.रेगे, सरपंच वसुंधरा उबाळे तसेच विविध विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडितआप्पा दरेकर, सुनीलचाचा जाधवराव, रामभाऊ दाभाडे, राजेंद्र सातव पाटील, बाळासाहेब सातव गवळी, बाळासाहेब सातव सर ,राजू वारघडे, शिवदास उबाळे, किसन महाराज जाधव, बाळासाहेब शिंदे, प्रफुल्ल शिवले, राजेंद्र नरवडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुरवठा, आरोग्य, महसूल, सामाजिक योजना, महा ई सेवा केंद्र, पोस्ट, वन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, भूमी अभिलेख, पीएमपीएमएल आदी विभागाचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध होते.

अशा विविध विभागाच्या माध्यमातून नवीन रेशन कार्ड नोंदणी, नाव दुरुस्ती, आरोग्य तपासणी, कोविड लसीकरण, तलाठी व मंडलाधिकारी उत्पन्नाचा चौकशी अहवाल, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब योजना, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, सर्व प्रकारची प्रतिज्ञापत्र, पॅनकार्ड, नवीन आधार कार्ड नोंदणी, नाव दुरुस्ती व आधार कार्ड लिंक करणे आदी कामे एकाच ठिकाणी ठेवण्यात आली असल्याने नागरिकांनी यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

“शिरूर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अँड.अशोकबापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तहसीलदार कार्यालय,पंचायत समिती,हवेली यांच्या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पार पाडला. यामध्ये दगडखाण कामगार बांधवांसह वाघोलीतील परिसरातील नागरिकांच्या आडलेल्या शासकीय कामांचा तातडीने जागेवरचं निपटारा करण्यात आला.याबद्दल सर्व नागरिकांच्या व संतुलन संस्थेच्यावतीने आमदार अँड.अशोकबापू पवार व प्रशासनाचे मनपुर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो.-अँड.बी.एम.रेगे,संस्थापक-: संतुलन संस्था

 

“वाघोली परिसरातील नागरिक व दगड खाण कामगार यांच्या असलेल्या नागरी समस्या सोडविण्यासाठी आमदार अँड.अशोकबापू पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता.महसूल प्रशासनच्या सहकार्यातून ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवण्यात आला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांचे प्रश्न जागेवरचं मार्गी लागले.त्याबद्दल समाधान वाटत आहे.”

सुनीलचाचा जाधवराव
सामाजिक कार्यकर्ते,वाघोली.

इंद्रधनू ग्रुप आयोजित मीनथडी जत्रेला नारायणगावकरांचा उस्फूर्त प्रतिसाद

नारायणगाव,किरण वाजगे

इंद्रधनू ग्रुप, जिजामाता पतसंस्था व सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या संस्थापिका राजश्री बोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या इंद्रधनू ग्रुपच्या मीनथडी जत्रेला नारायणगावकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.मिनथडी जत्रेचे उद्घाटन ब्रह्मकुमारी संगीता बेहेनजी यांच्या हस्ते तर राजश्री बेनके, सुमित्रा शेरकर, योगीता शेरकर, हर्षलता शहा, नेहा शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. इंद्रधनू ग्रुपला विनोद सेल्सचे पराग शहा व टीव्हीएस ऑटोचे राहुल पापळ यांचे सौजन्य लाभले.

इंद्रधनुग्रुपचे हे १२ वे वर्ष असून ८०० महिला सदस्य आहेत. महिलांच्या कलागुणांना खुले व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने इंद्रधनू ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, नवीन व्यवसाय, रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन मनोरंजन, प्रबोधन व प्रशिक्षणासह स्वयंसिद्ध बनविणे हा खरा इंद्रधनू ग्रुपचा हेतू आहे. मीनथडी जत्रेत एकूण ७० स्टॉल होते. बुधवार दि.२१ व गुरुवार २२ रोजी दोन दिवस पार पडलेल्या मीनथडी जत्रेत पंधरा ते सोळा लाखांची उलाढाल झाली असल्याचे राजश्री बोरकर यांनी सांगितले.मीनथडी जत्रेचे स्वरूप मोठे करावयाचे असल्याने इंद्रधनू ग्रुपला आर्थिक मदतीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास संस्थापिका राजश्री बोरकर, अध्यक्षा भारती खिंवसरा, उपाध्यक्षा पुष्पा जाधव, संचालिका शीतल ठुसे, ज्योती गांधी, सुरेखा वाजगे, निवेदिता डावखर, निर्मला गायकवाड, मनीषा बोरा, जुई बनकर, प्रांजल भुतडा, स्मिता लोणकर, सुनीता बोरा उपस्थित होत्या.यावेळी अनेकांनी येथील खाद्यपदार्थांवर ताव मारला व विविध वस्तूंची खरेदी केली.

कामगारांच्या हितासाठी ऊर्जामंत्री यांनी घेतली कंत्राटी कामगारांची बैठक

कुरकुंभ ,सुरेश बागल

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज शुक्रवार (दि.२२) रोजी दुपारी ४:०० वा. त्यांच्या मुंबईतील पर्णकुटी या बंगल्यावर वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) पदाधिकारी समावेत बैठक घेतली.

तिन्ही वीज कंपनीत वर्षानुवर्षे काम करत असलेल्या अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना पंजाब सरकार प्रमाणे कायम करावे. हा निर्णय होई पर्यंत रानडे समितीच्या अहवालाच्या धर्तीवर या कामगारांना कंत्राटदार मुक्त व वयाच्या ६० वर्षा पर्यंत रोजगाराची हमी द्यावी. कंत्राटदार जी आर्थिक पिळवणूक करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी संघटनेने मागणी केली.

रोजंदारी कामगार पद्धतीची मागणी संघ २०१५ पासून करत आहे. त्याचा अहवाल आज संघटनेने ऊर्जामंत्री यांना दिला. या अहवालाचा व अन्य राज्यातील वीज कामगार विषयक अभ्यास करून या बाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

या निर्णयाला मूळे कंत्राटदारांच्या जाचातून कामगार मुक्त होतील व वीज कंपन्यांचा देखील आर्थिक फायदा होईल असे संघटनेने नमुद केले आहे.

या मिटिंग साठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष नीलेश खरात, वीज कामगार महासंघाचे मार्गदर्शक अण्णा देसाई कामगार महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव, महामंत्री अरुण पिवळ, प्रशांत भांबुर्डेकर, सुनील कासरे तसेच वीज कंत्राटी कामगार संघांचे कार्याध्यक्ष उमेश आनेराव, संघटनमंत्री राहुल बोडके, उपाध्यक्ष संदीप गवारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी भूसंपदनाच्या मोबदल्याचा सदुपयोग करावा-डॉ.राजेश देशमुख

गणेश सातव,वाघोली

पुणे-नाशिक मध्यम द्रुतगती रेल्वेमार्गाच्या कामाकरिता हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द,तुळापूर,भावडी या तीन गावातील जमिनीच्या भूसंपादनाचे खरेदीखत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या मोबदल्याचा सदुपयोग करावा,असे आवाहन डॉ.देशमुख यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी उपजिल्हाधिकारी व भूसंपदान अधिकारी रोहिणी आखाडे, महारेल (जमिन) सहमहाव्यवस्थापक भानुदास गायकवाड, महारेलचे सहमहाव्यवस्थापक सुनिल हवालदार हे उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, हवेली तालुक्यातील मांजरी खुर्दचे ८ गट, तुळापूर २ आणि भावडीतील १ गटाचे खरेदीखत करण्यात आले असून यामध्ये शेतकऱ्यांना ७८ कोटी रुपयांचा भूसंपादन मोबदला वाटप करण्यात येत आहे. हवेली तालुक्यातील पेरणे, भावडी, तुळापूर व मांजरी खुर्द गावातील ७० टक्के खरेदीखताची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत खरेदीखते लवकरच पूर्ण करण्यात येतील.
खेड तालुक्यातील बाह्य वळणरस्ता व रेल्वे मोजणीची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली असून लवकरच त्यांच्याही भूसंपादनाचा मोबदला वाटप करण्यात येईल. भूसंपादनाची प्रक्रीया पूर्ण झाल्यावर तातडीने रेल्वेमार्गाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मांजरी खुर्दचे माजी सरपंच किशोर उंद्रे यांनी जमीन खरेदीला चांगला मोबदला दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांच्या हस्ते मांजरी खुर्द, तुळापूर आणि भावडी गावातील जमीनधारक शेतकऱ्यांना स्वाक्षरीसाठी खरेदीखताचे दस्त वाटप करण्यात आले. यावेळी महसूल विभागातील अधिकारी,कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जुन्नर येथे उद्घाटन

नारायणगाव – किरण वाजगे

छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापाशी जुन्नर नगरीच्या पाच रस्ता चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात आणि आनंदात करण्यात आले. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई पारंपरिक वाद्य यासह डीजेच्या तालावर शिवभक्त आनंदात डौलाने थिरकले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हे भव्य दिव्य उद्घाटन झाले.

याप्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस किशोर दांगट, बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, पुणे जिल्हा बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे पाटील, उज्वला शेवाळे, जुन्नर चे नगराध्यक्ष श्याम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे, देवराम लांडे, शरद लेंडे, शहराध्यक्ष पापा खोत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की भारतामध्ये आदिलशाही मुघलशाही कुतुबशाही अशा अनेक राजवटी उदयाला आल्या मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीला रयतेचे राज्य असेच संबोधले गेले यापुढे देखील जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गवळी आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर तालुक्यात बिबट्या सफारी करावी असा माझा हट्ट आहे असे सांगितले प्रास्तविक नगराध्यक्ष शाम पांडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी यांनी मानले.

दरम्यान या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जुन्नर तालुका संपर्कप्रमुख दिलीप बाम्हणे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे , जिल्हा परिषद सदस्य गुलाब शेठ पारखे, युवा सेनेचे विकी पारखे, सरपंच योगेश पाटे, विकास राऊत, जुन्नर शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत डोके हे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला काही काळ उपस्थित होते. मात्र त्यांचा नामोल्लेख न झाल्यामुळे त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली.

दरम्यान छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकार करणारे, शिवजन्मभूमीचे सुपुत्र व शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे शिवजयंती नंतर आज सुद्धा झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमास उपस्थित नसल्यामुळे अनेक शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली.
२. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून पुणे जिल्ह्यात गाजत असलेला बिबट सफारीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर आश्वासन देत जुन्नर तालुक्यात बिबट्या सफारी होण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. यासाठी दीड कोटी रुपये प्रकल्प आराखड्यासाठी (डीपीआर साठी) त्यांनी घोषित केले.

यश मिळवण्यासाठी ध्येय्य निश्चिती गरजेची – उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे

नारायणगांव ,किरण वाजगे – यश मिळवण्यासाठी शैक्षणिक जीवनापासून ध्येय्य निश्चित करून मेहनत घेणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच इतर विद्यार्थी विकास प्रकल्पामध्ये भाग घेतला पाहिजे, असे मत जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी कुरण (ता.जुन्नर) येथे बोलताना व्यक्त केले.

एन.एस.एस. तसेच एन.सी.सी. यासारख्या प्रकल्पामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास तर होतोच शिवाय सामान्य ज्ञान विकसित होण्यास मदत होते. स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी या गोष्टींचा कसा उपयोग होतो हे स्वतःचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर ठेवताना त्यांनी सांगितले. कुरण येथील जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याचबरोबर तरूण मुलामुलींनी सोशल मिडीयाचा वापर करताना काय काळजी घेतली पाहिजे हे महाविद्यालयीन तरूणांना पटवून दिले.

जयहिंद शैक्षणिक संकुलाचे वार्षिक कला व क्रिडा स्पर्धा स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध क्रिडा स्पर्धा पार पडल्या तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. हेमंत महाजन, प्रा. अमित हेजीब यांनी केले. क्रिडा स्पर्धांसाठी प्रा. देविराज अबुज व प्रा. सचिन भोसले यांनी काम पाहिले. प्रा. सुभाष कुडेकर हे परिक्षक म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर, नारायणगांवचे सरपंच योगेश पाटे, जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे,इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. गरकळ, तंत्रनिकेतनचे प्राचार्य योगेश गुंजाळ, आय. टी. आय.चे प्राचार्य एस. डी. आंद्रे उपस्थित होते.

कवठे येमाई येथील सायंबा नगर(पोकळदरा) भागशाळेत शाळापुर्व तयारी मेळावा संपन्न.

धनंजय साळवे- कवठे येमाई येथील सायंबा नगर (पोकळदरा)भागशाळेत शाळापुर्व तयारी मेळावा संपन्न झाला.जे विद्यार्थी पुढील वर्षी पहिली मध्ये प्रवेश घेणार आहेत त्यांची अंगणवाडी तयारी करुन घेण्यात येणार आहे.यावेळी त्यांची बुध्दिमत्ता किती आहे हे तपासण्यात आली.तसेच मुलांना फेटे बांधुन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री.मारुती पळसकर,ग्रा.पंचायत सदस्या सौ.सुनिताताई पोकळे, श्री. निलेशशेठ पोकळे, युवानेते अविनाशदादा पोकळे,श्री.सोनभाऊ पोकळे, श्री.आनंदरावशेठ पोकळे,श्री. साहेबराव पोकळे,श्री. विलास पोकळे,श्री. कैलास पोकळे,श्री. शंकर पोकळे,सौ‌.लता पोकळे,सौ.स्वाती पोकळे, श्री.दंडवते गुरुजी, सौ.शिंदे मॅडम मान्यवर उपस्थित होते , यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप श्री विलास रंगनाथ पोकळे यांनी दिले,तसेच आभार मुख्याध्यापक शिंदे गुरुजी यांनी मानले.

वाघोलीत उद्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन

गणेश सातव ,वाघोली -पुणे

सर्वसामान्य नागरिक व असंघटित दगडखाण कामगारांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी उद्या शुक्रवार (दि.२२) एप्रिल रोजी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनाच्यावतीने वाघोली येथील सोयरिक गार्डन मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, शिरूर हवेलीचे आमदार अँड. अशोक पवार,हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले,तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शासन आपल्या दारी या उपक्रमात पुरवठा विभाग,आरोग्य विभाग,महसूल विभाग,सामाजिक योजना,महा-ई सेवा केंद्र,आधार कार्ड,पोस्ट विभाग,ई-श्रम कार्ड आदी विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

नवीन रेशन कार्ड नोंदणी,नाव दुरुस्ती,आरोग्य तपासणी,कोविड लसीकरण,तलाठी व मंडलाधिकारी दाखला,चौकशी अहवाल, संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना,राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना, उत्पन्नाचा दाखला,रहिवाशी प्रमाणपत्र, डोमिसाईल दाखला,ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र,सर्व प्रकारची प्रतिज्ञापत्र, पॅनकार्ड, नवीन आधार कार्ड नोंदणी,आधार नाव दुरुस्ती,आधार कार्ड लिंक आदी कामे तात्काळ एकाच ठिकाणी होणार आहेत.

त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी, व आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी योग्य कागदपत्रासह सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आळंदी,मरकळ, तुळापूर ,लोणीकंद रस्त्यासाठी ३५ कोटींचा निधी मंजूर

पुणे – राज्याच्या अर्थसंकल्पात हवेली तालुक्यातील आळंदी मरकळ तुळापूर लोणीकंद रस्त्याची सुधारणा करण्यासाठी व इंद्रायणी नदीवरील कमकुवत पुलाच्या पुनर्बाधणीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या निधी मागणीला पालकमंत्री अजितदादा पवार यांनी प्रतिसाद देत एकूण रु. ३५ कोटींचा निधी मंजूर केला असून यापैकी रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.

आळंदी मरकळ तुळापूर लोणीकंद (राज्य मार्ग ११६) या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे धोक्याचे झाले आहे. तसेच कि.मी. ३१ वर असलेला इंद्रायणी नदीवरील पूल कमकुवत झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक बनला असल्याने या रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण आणि बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे यांच्याकडे या रस्त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री पवार यांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लोणीकंद (रा.मा.११६) रस्त्यावरील कि.मी.३१/०० वरील इंद्रायणी नदीवरील पुलासाठी रु. ११ कोटी तर कि.मी. २१/४०० ते कि. मी. ३१/०० रस्त्यासाठी रु. १२ कोटी आणि कि.मी. ३१/०० ते कि.मी. ३८/०० या ७ कि.मी. लांबीसाठी १२ कोटी असा एकूण रु. ३५ कोटींचा भरीव निधी मंजूर केला.

या मंजूर कामापैकी रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून येत्या २२ एप्रिलपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत आहे. तर पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया येत्या आठवडाभरात सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असलेल्या या आळंदी मरकळ तुळापूर लोणीकंद (राज्य मार्ग ११६) या रस्त्याच्या सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे.

या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, वर्षानुवर्षे खराब झालेल्या आळंदी मरकळ तुळापूर लोणीकंद (राज्य मार्ग ११६) या रस्त्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले होते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असलेल्या श्रीक्षेत्र आळंदी आणि छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर या धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या स्थळांना जोडणारा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असल्याची जाणीव सातत्याने होत होती. मात्र मध्यंतरी कोविड संकटकाळात निधीची कमतरता असल्याने थोडा उशीर झाला असला तरी आता जनतेला चांगला रस्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक जनता, मतदार व प्रवास करणाऱ्या वाहनचालक या सर्वांना लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण जनतेला दिलेल्या आश्वासनापैकी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रस्त्यांची कामे, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, पुणे शिरूर रस्ता, तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता, कोरेगाव भीमा, वढु, चौफुला, केंदूर पाबळ रस्ता आणि सर्वात जिव्हाळ्याचा विषय असलेली बैलगाडा शर्यत सुरू करण्यात यशस्वी झालो याचा मनस्वी आनंद आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना डॉ. कोल्हे यांनी मनापासून धन्यवाद दिले, तर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे या सर्वांचे सहकार्य लाभले याचा विशेष उल्लेख खासदार डॉ. कोल्हे यांनी केला.

पेंशन धारकांना किमान पेंशन पाच हजार रूपये व महागाई भत्ता देण्याची मागणी

कुरकुंभ, सुरेश बागल
शुक्रवार ( दिं. १५ ) रोजी भारतीय मजदूर संघ, जळगाव जिल्हा अधिवेशन झुलेलाल सभागृह जळगाव या ठिकाणी दुपारी ३ ते ५ या वेळेत संपन्न झाले. अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून विश्वहिंदू परिषदेचे योगेश गर्गे यांची उपस्थिती होती. भारतीय मजदूर संघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष पी जे आप्पा पाटील, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री मोहनराव येनुरे, प्रदेश संघटन मंत्री श्रीपाद कुटासकर, प्रदेश सचिव प्रवीण अमृतकर, विभाग संघटन मंत्री सचिन मेंगाळे हे उपस्थित होते. प्रवीण अमृतकर यांनी श्रमिक गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अधिवेशनास सुरवात झाली. सूत्र संचालन सुरेश सोनार यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा सचिव किरण पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे योगेश गर्गे यांनी मार्गदर्शन केले.

अधिवेशनात पुढील ठराव पारित करण्यात आले. १) बांधकाम कामगारांना पेन्शन सुरू करावे २) घरेलू कामगारांसाठी कल्याणकारी योजना सुरू कराव्या ३) गरोदर महिला बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये दरमहा मदत घ्यावी. ४) निवृत्त औधोगिक कामगारांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावी व त्या सोबत बदलला महागाई भत्ता देण्यात यावे ५) जळगाव येथे इ एस आय चे स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करावे. असे पाच ठराव पारीत करणयात आले. महामंत्री मोहन येनुरे यांनी जळगाव जिल्हा कार्यकरिणी जाहीर करून मार्गदर्शन केले.

या वेळी जळगाव विभागातील जुन्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा कार्यगौरव सत्कार करण्यात आला.या अधिवेशन यशस्वी करण्यासाठी भारतीय मजदूर संघाचे जेष्ठ पदाधिकारी श्री प्रभाकर बाणासुरे व सुरेश सोनार यांनी परिश्रम केले.

अध्यक्ष किरण पाटील (वीज )
कार्याध्यक्ष विकास चौधरी (वीज)
उपाध्यक्ष १) बी बी सपकाळे (संरक्षण)
२) गोपाळ चौधरी (जर्दा)
३) श्रीमती राधा नेतले
(नगरपालीका)
४) आत्माराम शिवदे (मच्छीमार)
५) नारायण पाटील (पटेल जर्दा)
६) सुनील कोळी (बांधकाम)
जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी (वीज)
सहसचिव १) उमाकांत खेवलकर (नगरपालिका)
२) अशोक मोरे (नगरपालिका)
३) सौ मंगलाबाई चोधारी (घरेलू)
४) सुधाकर शिंदे (असंघटित)
५) किशोर पवार (नगरपालिका)
६ ) पंकज पाटील (संरक्षण)

कोषाध्यक्ष प्रकाश गोसावी (नगरपालिका ) संघटन मंत्री कैलास रोकडे सुरेश सोनार यांनी कार्यकरिणी सदस्य यांची नावे जाहीर केली

तसेच महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाचे पदाधिकारी श्री सचिन भावसार( भुसावळ) व सलिम पिंजारी (अंमळेनेर) यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

तसेच जिल्ह्य संघटनांचे अध्यक्ष/सरचिटणीस हे पदसिद्ध कार्यकारणी सदस्य असतील असे जाहिर केले. नूतन जिल्हा सचिव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अधिवेशनाचा समारोप महामंत्री मोहन येनुरे यांनी केला. आभार प्रदर्शन संघटन मंत्री कैलास रोकडे यांनी केले. राष्ट्रगीताने अधिवेशनाची सांगता झाली या वेळी विविध उद्योगागीत संघटित, असंघीटत कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.