कवठे येमाई येथील सायंबा नगर(पोकळदरा) भागशाळेत शाळापुर्व तयारी मेळावा संपन्न.

धनंजय साळवे- कवठे येमाई येथील सायंबा नगर (पोकळदरा)भागशाळेत शाळापुर्व तयारी मेळावा संपन्न झाला.जे विद्यार्थी पुढील वर्षी पहिली मध्ये प्रवेश घेणार आहेत त्यांची अंगणवाडी तयारी करुन घेण्यात येणार आहे.यावेळी त्यांची बुध्दिमत्ता किती आहे हे तपासण्यात आली.तसेच मुलांना फेटे बांधुन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री.मारुती पळसकर,ग्रा.पंचायत सदस्या सौ.सुनिताताई पोकळे, श्री. निलेशशेठ पोकळे, युवानेते अविनाशदादा पोकळे,श्री.सोनभाऊ पोकळे, श्री.आनंदरावशेठ पोकळे,श्री. साहेबराव पोकळे,श्री. विलास पोकळे,श्री. कैलास पोकळे,श्री. शंकर पोकळे,सौ‌.लता पोकळे,सौ.स्वाती पोकळे, श्री.दंडवते गुरुजी, सौ.शिंदे मॅडम मान्यवर उपस्थित होते , यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप श्री विलास रंगनाथ पोकळे यांनी दिले,तसेच आभार मुख्याध्यापक शिंदे गुरुजी यांनी मानले.

Previous articleवाघोलीत उद्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन
Next articleयश मिळवण्यासाठी ध्येय्य निश्चिती गरजेची – उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे