वाघोलीत उद्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन

गणेश सातव ,वाघोली -पुणे

सर्वसामान्य नागरिक व असंघटित दगडखाण कामगारांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी उद्या शुक्रवार (दि.२२) एप्रिल रोजी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनाच्यावतीने वाघोली येथील सोयरिक गार्डन मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, शिरूर हवेलीचे आमदार अँड. अशोक पवार,हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले,तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शासन आपल्या दारी या उपक्रमात पुरवठा विभाग,आरोग्य विभाग,महसूल विभाग,सामाजिक योजना,महा-ई सेवा केंद्र,आधार कार्ड,पोस्ट विभाग,ई-श्रम कार्ड आदी विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

नवीन रेशन कार्ड नोंदणी,नाव दुरुस्ती,आरोग्य तपासणी,कोविड लसीकरण,तलाठी व मंडलाधिकारी दाखला,चौकशी अहवाल, संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना,राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना, उत्पन्नाचा दाखला,रहिवाशी प्रमाणपत्र, डोमिसाईल दाखला,ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र,सर्व प्रकारची प्रतिज्ञापत्र, पॅनकार्ड, नवीन आधार कार्ड नोंदणी,आधार नाव दुरुस्ती,आधार कार्ड लिंक आदी कामे तात्काळ एकाच ठिकाणी होणार आहेत.

त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी, व आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी योग्य कागदपत्रासह सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleआळंदी,मरकळ, तुळापूर ,लोणीकंद रस्त्यासाठी ३५ कोटींचा निधी मंजूर
Next articleकवठे येमाई येथील सायंबा नगर(पोकळदरा) भागशाळेत शाळापुर्व तयारी मेळावा संपन्न.