पेंशन धारकांना किमान पेंशन पाच हजार रूपये व महागाई भत्ता देण्याची मागणी

कुरकुंभ, सुरेश बागल
शुक्रवार ( दिं. १५ ) रोजी भारतीय मजदूर संघ, जळगाव जिल्हा अधिवेशन झुलेलाल सभागृह जळगाव या ठिकाणी दुपारी ३ ते ५ या वेळेत संपन्न झाले. अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून विश्वहिंदू परिषदेचे योगेश गर्गे यांची उपस्थिती होती. भारतीय मजदूर संघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष पी जे आप्पा पाटील, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री मोहनराव येनुरे, प्रदेश संघटन मंत्री श्रीपाद कुटासकर, प्रदेश सचिव प्रवीण अमृतकर, विभाग संघटन मंत्री सचिन मेंगाळे हे उपस्थित होते. प्रवीण अमृतकर यांनी श्रमिक गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अधिवेशनास सुरवात झाली. सूत्र संचालन सुरेश सोनार यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा सचिव किरण पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे योगेश गर्गे यांनी मार्गदर्शन केले.

अधिवेशनात पुढील ठराव पारित करण्यात आले. १) बांधकाम कामगारांना पेन्शन सुरू करावे २) घरेलू कामगारांसाठी कल्याणकारी योजना सुरू कराव्या ३) गरोदर महिला बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये दरमहा मदत घ्यावी. ४) निवृत्त औधोगिक कामगारांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावी व त्या सोबत बदलला महागाई भत्ता देण्यात यावे ५) जळगाव येथे इ एस आय चे स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करावे. असे पाच ठराव पारीत करणयात आले. महामंत्री मोहन येनुरे यांनी जळगाव जिल्हा कार्यकरिणी जाहीर करून मार्गदर्शन केले.

या वेळी जळगाव विभागातील जुन्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा कार्यगौरव सत्कार करण्यात आला.या अधिवेशन यशस्वी करण्यासाठी भारतीय मजदूर संघाचे जेष्ठ पदाधिकारी श्री प्रभाकर बाणासुरे व सुरेश सोनार यांनी परिश्रम केले.

अध्यक्ष किरण पाटील (वीज )
कार्याध्यक्ष विकास चौधरी (वीज)
उपाध्यक्ष १) बी बी सपकाळे (संरक्षण)
२) गोपाळ चौधरी (जर्दा)
३) श्रीमती राधा नेतले
(नगरपालीका)
४) आत्माराम शिवदे (मच्छीमार)
५) नारायण पाटील (पटेल जर्दा)
६) सुनील कोळी (बांधकाम)
जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी (वीज)
सहसचिव १) उमाकांत खेवलकर (नगरपालिका)
२) अशोक मोरे (नगरपालिका)
३) सौ मंगलाबाई चोधारी (घरेलू)
४) सुधाकर शिंदे (असंघटित)
५) किशोर पवार (नगरपालिका)
६ ) पंकज पाटील (संरक्षण)

कोषाध्यक्ष प्रकाश गोसावी (नगरपालिका ) संघटन मंत्री कैलास रोकडे सुरेश सोनार यांनी कार्यकरिणी सदस्य यांची नावे जाहीर केली

तसेच महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाचे पदाधिकारी श्री सचिन भावसार( भुसावळ) व सलिम पिंजारी (अंमळेनेर) यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

तसेच जिल्ह्य संघटनांचे अध्यक्ष/सरचिटणीस हे पदसिद्ध कार्यकारणी सदस्य असतील असे जाहिर केले. नूतन जिल्हा सचिव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अधिवेशनाचा समारोप महामंत्री मोहन येनुरे यांनी केला. आभार प्रदर्शन संघटन मंत्री कैलास रोकडे यांनी केले. राष्ट्रगीताने अधिवेशनाची सांगता झाली या वेळी विविध उद्योगागीत संघटित, असंघीटत कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous articleश्री माताजी निर्मला देवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सहजयोग परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रम
Next articleआळंदी,मरकळ, तुळापूर ,लोणीकंद रस्त्यासाठी ३५ कोटींचा निधी मंजूर