कवठे येमाई येथे जागतिक हिवताप दिन साजरा

 धनंजय साळवे- कवठे येमाई येथील जि.प.प्रा.शाळेमध्ये जागतिक हिवताप दिन जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती शिरुर, प्रा.आरोग्य केंद्र,व येमाई माता शैक्षणिक सामाजिक क्रिडा संघ(येस क्लब) यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

यावेळी आरोग्य कर्मचार्यानी हिवताप होण्याची कारणे ,दुषित पाणी, डास पैदास होण्याची ठिकाणे,डास निर्मुलन करण्यासाठी करण्याच्या उपाययोजना, डासांची पैदास कमी करण्यासाठी रासायणिक औषध फवारणी, धुरफवारणी, साचलेले पाणी व तुंबलेले गटारे वाहती करणे,गप्पीमासे सोडणे,परीसरस्वच्छता,आरोग्य शिक्षण, मेंदुज्वर,जलद ताप सर्वेक्षण, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळणे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर हिवताप जनजागरण फेरी गावातुन काढण्यात आली.

या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दामोदर मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री नामदेव पानगे,श्री. जालिंदर मारणे तालुका हिवताप पर्यवेक्षक, श्री.रोहिदास नवले आरोग्य सहाय्यक, श्री. गंगाराम कोकडे आरोग्य सहाय्यक, श्री. संजय परदेशीं आरोग्य सहाय्यक, श्री. संजय मिसाळ आरोग्य सहाय्यक श्री. लक्ष्मण थोंगिरे आरोग्य सहाय्यक, श्री.डी ए मारणे आरोग्य सहाय्यक, मुख्याध्यापक शांताराम पोकळे सर,श्री.फंडसर,सौ.कुभार मॅडम, सा.कार्यकर्त्ये श्री.सोपान वागदरे, श्री.अनिल रायकर,श्री.गोपीनाथ रायकर,ग्रामस्थ कवठे, जि.प.शालेय विद्यार्थी आणि परीसरातील सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनायक गोसावी यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत येस क्लबचे उपाअध्यक्ष डॉ. संतोष उचाळे व आभार अध्यक्ष नवनाथशेठ सांडभोर यांनी मानले.

Previous articleदुर्देवी- कालव्यात बुडणाऱ्या एकाचा मृत्यू , तिघांचे वाचवले प्राण
Next articleनारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवाच्या यात्रेला प्रारंभ